अजान, हनुमान चालीसासाठी भोंगे लावा, मात्र नियम पाळून - गृहमंत्री

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे माझी जबाबदारी आहे.
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSaam TV

रश्मी पुराणिक -

पुणे : अजानसाठी भोंगा लावता तसा हनुमान चालीसाला पण लावा मात्र नियमांचे पालन करुन लावा असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केला आहे. ते साम टिव्हीच्या लिडींग आयकॅान्स ॲाफ महाराष्ट्र या पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. (Leading Icons of Saam TV)

माझी पोलीस अधिकारी मंत्री तुरुंगात जावे लागते असा प्रश्न विचारला असता गृहमंत्री म्हणाले, 'आज जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे अशी कधीही नव्हती. देशात अनेक सरकार आले आणि गेली आज केंद्रीय यंत्रणा वापर केलं जातोय. नागपूरात पक्षाच्या विरोधी बोलणाऱ्यांच्या वकीलाला सकाळी पाच वाजता जाऊन ईडी अटक करतेय काय दिसतं? आपल्याला राजकीय विरोध करून थांबवता येत नाही त्यामुळे वेगळ्या पद्धतीने बदनाम करायचं हे चाललं आहे अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

तसंच माझी जबाबदारी आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे. आज पोलीस यंत्रणाना पण केंद्रीय यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा केंद्रीय यंत्रणा भीती दाखवत असतील तर देश कुठे घेऊन चाललो महाराष्ट्रात असे राजकरण नव्हते असंही गृहमंत्री म्हणाले.

Dilip Walse Patil
कोल्हापूरात भाजपची नाचता येईना अंगण वाकडं अशी स्थिती - नाना पटोले

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राने विधानसभेतील अनेक दर्जेदार चर्चा ऐकली आहे. विकासाच्या विषयावर एकत्र येऊन चर्चा केली आहे. मात्र ,आज फक्त विरोधात बोललात तर कारवाई करू, हे फेडरल स्ट्रक्चर सुरु आहे. त्यामुळे राज्यातील व्यवस्थेवर केंद्राचा किती विश्वास हे सिद्ध होतं. आज राजकारणाचे वातावरण बिघडत आहे. अजानला भोंगा लावला म्हणून हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावू हा महाराष्ट्रातील राजकारणचा विषय होऊ शकत नाही. दुसऱ्या राज्यातील घटना साठी मोर्चा इथे निघतो. प्रत्येकाने मर्यादा पळाली पाहिजे अजानसाठी भोंगा लावायचा असो वा हनुमान चालीसाठी लावावा मात्र नियमांचे पालन करुन असही त्यांनी यावेळी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com