ऐतिहासिक शिरकाई देवी मंदिराची पडझड राजेशिर्के घराण्याने काढली भरून

याबद्दल गावकऱ्यांनी आणि इतिहास प्रेमींनी समाधान व्यक्त केले.
ऐतिहासिक शिरकाई देवी मंदिराची पडझड राजेशिर्के घराण्याने काढली भरून
ऐतिहासिक शिरकाई देवी मंदिराची पडझड राजेशिर्के घराण्याने काढली भरूनओंकार कदम
Published On

सातारा - २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगडाच्या Raigad पायथ्याशी असणाऱ्या ऐतिहासिक आई शिरकाई देवीच्या मंदिराच्या Temple मागील भिंत कोसळली होती. रायगडाची गडदेवता शिरकाई देवीच्या गडावर एक आणि पायथ्याशी एक मंदिर आहे. राजेशिर्के घराण्याची ही कुलदेवता असल्याने पायथ्याच्या मंदिराचे नूतनीकरण करण्यासाठी सुहास राजेशिर्के यांनी पुढाकार घेतला होता. त्याचबरोबर परिसरातील वाड्या-वस्त्यांमधील ग्रामस्थांनी श्रमदानातून नूतनीकरणाचे काम पूर्णत्वास नेले, त्याला गुरुवारी दि. २ सप्टेंबर रोजी वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलताना राजेशिर्के यांनी गडाच्या परिसरातील धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याची सूचना ग्रामस्थांना केली.

हे देखील पहा -

गडावरील कुलस्वामिनी आई शिरकाई मंदिराच्या नूतनीकरणासाठीही पुरातन खात्याशी सल्ला मसलत करून प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन राजेशिर्के दिले. रायगड गाईड संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेने मंदिरासाठी गेले दोन महिने दिवस-रात्र एक केल्याने कामे वेळेत पूर्ण झाली. याबद्दल गावकऱ्यांनी आणि इतिहास प्रेमींनी समाधान व्यक्त केले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com