Wasmat News : खराब रस्त्यावर विद्यार्थ्यांचे अपघात; चक्क शिक्षकाने खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर मागितली भीक

HIngoli News : वसमत शहरातून तीन जिल्ह्यांना जोडणारा राज्य महामार्ग सध्या दुरुस्तीविना खराब झाला आहे. अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर चिखलमय झाल्याने शाळकरी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या वाहनाचे अपघात
Wasmat News
Wasmat NewsSaam tv
Published On

हिंगोली : रस्त्यांची दुरावस्था झाल्याने लहान- मोठे अपघात नेहमीच होत असतात. यात शाळेतील विद्यार्थ्यांचा खराब रस्त्यावरून प्रवास करताना अपघात होत असल्याने जीव कासावीस झालेल्या हिंगोलीतील एका शिक्षकाने आंदोलन पुकारले. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी सरकारच्या विरोधात आंदोलन करत चक्क वाहन चालकांना भीक मागत सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला.  

प्रशांत लोखंडे असे या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. हिंगोलीच्या वसमत शहरांमध्ये लोखंडे यांनी हे आंदोलन केले असून वसमत शहरातून तीन जिल्ह्यांना जोडणारा राज्य महामार्ग सध्या दुरुस्तीविना खराब झाला आहे. अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर चिखलमय वातावरण झाल्याने शाळकरी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या वाहनाचे अपघात होत असतात. मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नाही. 

Wasmat News
Ganesh Visarjan Rally : विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट, डीजे, डॉल्बीवर बंदी; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

विद्यार्थ्यांच्या अपघाताने शिक्षक बेजार 

रस्त्यावर होत असलेल्या अपघातांमध्ये विद्यार्थ्यांचे देखील अपघात झाले आहेत. यात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. हे पाहून शिक्षक कासावीस झाला. दरम्यान शासनाला वारंवार निवेदन देऊन देखील रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने आज लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या विरोधात या शिक्षकांनी हे आंदोलन केले आहे. रस्त्यावरून येणाऱ्या वाहन चालकांकडे खड्डे बुजविण्यासाठी भीक मागितले.  

Wasmat News
Yawal Crime News : किरकोळ वादातून शस्त्राने वार करत हत्या; हत्येनंतर मारेकरी पोलिसात जमा

गाणे म्हणत सरकारला केलं जाग

शिक्षकाने हे आंदोलन करत वाहन चालकांना थांबवत पैसे मागितले. इतकेच नाही तर यावेळी या शिक्षकाने खास गाण्याच्या माध्यमातून कुंभकर्ण झोपेत असलेल्या राज्य महामार्ग प्रशासनाला जागे करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. शिक्षकाच्या या अनोख्या आंदोलनामुळे लक्ष वेधले गेले असून आता तरी प्रशासन जागे होऊन रस्ता दुरुस्ती करेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com