Heavy Rain : मुसळधार पावसाने धरणे पुन्हा भरली; हिंगोलीतील तिन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग

Hingoli News : हिंगोली जिल्ह्याला देखील पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे नदी- नाल्यांना मोठे पूर आल्याने हे पाणी धरणात जात असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे
Hingoli News
Hingoli NewsSaam tv
Published On

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने धरण क्षेत्रात मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही धरणातून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी नद्या देखील दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यातच हिंगोली जिल्ह्याला देखील पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे नदी- नाल्यांना मोठे पूर आल्याने हे पाणी धरणात जात असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणाचे ६ गेट ०.३ मीटरने उघडण्यात आले असून पूर्णा नदीच्या पाण्यात त्यामुळे धरणाचे एकुण १२ दरवाजातून ९८६९ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर येलदरी धरणाचे २ दरवाजे ०.५ मीटरने उघडण्यात आले आहे. 

Hingoli News
Wasmat News : खराब रस्त्यावर विद्यार्थ्यांचे अपघात; चक्क शिक्षकाने खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर मागितली भीक

मांजरा धरणाची हॅट्रिक, सलग तिसऱ्यांदा तुडुंब
धाराशिव : धाराशिव सह लातुर व बीड जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण यंदा सलग तिसऱ्यांदा तुडुंब भरले आहे. ऑगस्ट महिन्यातच धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने कळंब तालुक्यासह परीसरातील तब्बल १८ हजार २२३ हेक्टर शेतीला पाणीपुरवठ्याची हमी मिळाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खडकी, लोहटा पुर्व पश्चिम, करंजकल्ला, कोथळा, हिंगनगाव, दाभा, आवाड शिरपुरा, सौंदना अंबा, वाकडी आदी गावांचा शिवार पुन्हा हिरवाईने नटणार आहे.

Hingoli News
Electric Shock : बांधकामाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू; सळई ओढताना घडली दुर्घटना

गेरू माटरगाव धरण ओव्हरफ्लो
बुलढाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असल्याने तालुक्यातील छोटे मोठे धरणे ओहरफ्लो झाले आहेत. तसेच खामगाव शहराला पाणी पुरवठा करणारे गेरू माटरगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यातून पाणी विसर्ग होत आहे. आता खामगाव शहराची पाण्याची समस्या मिटली आहे. तर जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या पेनटाकळी प्रकल्पाच्या कॅच मेट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने आज सकाळी प्रकल्प ८९. ४९ टक्के भरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com