पीकविमा देण्यास टाळाटाळ; कंपनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड

पीकविमा देण्यास टाळाटाळ; कंपनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड
crop insurance
crop insurancesaam tv
Published On

हिंगोली : पीकविमा काढला असताना पिंकाचे नुकसान होवून देखील शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात आला नव्‍हतो. पिकविमा देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा कंपनीवर आरोप केला. या कारणावरून हिंगोलीत (Hingoli) स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पीकविमा कंपनीच्या कार्यालयातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. (hingoli news Avoid crop insurance Vandalism of company office supplies)

crop insurance
त्‍या चौघांचा मृत्‍यू वेगवेगळ्या आजारातून; शवविच्‍छेदनात स्‍पष्‍ट

पीकविमा कंपनी शेतकऱ्यांकडून (Farmer) पैसे भरून घेत आहे. मात्र नुकसान झाल्यानंतर भरपाई देण्याऐवजी सरकारकडे बोट दाखवत असल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. विशेष म्हणजे या आधी देखील पीक विम्याचा (Crop Insurance) प्रश्न घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हिंगोलीच्या कृषी विभागात ठिय्या आंदोलन केले होते.

पोलिसांनी घेतले ताब्‍यात

हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांना पिकविमा कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. हिंगोली शहरातील पीकविमा कंपनीचे कार्यालय गाठून तोडफोड केली आहे. दरम्यान या तीव्र आंदोलनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना हिंगोली पोलिसांनी (Hingoli Police) ताब्यात घेतले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com