Hingoli News : कुलरची थंड हवा जीवावर बेतली; शॉक लागून 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Hingoli News : एका १४ वर्षीय मुलाचा कुलरचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. तसेच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Hingoli News
Hingoli NewsSaam TV

भरत नागरे

हिंगोलीमध्ये काळीज पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. एका १४ वर्षीय मुलाचा कुलरचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झालाय. सदर घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. तसेच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Hingoli News
Dhule Accident : दुचाकीला कारची मागून धडक; अपघातात भावा-बहिणीचा मृत्यू

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील सुकळी खुर्द गावामध्ये ही घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या मुलाचं नाव गणेश किल्लारी असं आहे. सध्या उन्हाळा सुरु असल्याने सर्वत्र यावर उपाय शोधले जात आहे. व्यक्ती घरामध्ये कुलर, एसी अशा गोष्टींचा वापर करत आहेत. गणेश देखील घरामध्ये जास्त गरम होत असल्याने कुलर लावण्यासाठी गेला.

त्याने कुलरमध्ये पाणी ओतले आणि तितक्यात होत्याचं नव्हतं झालं. थंड हवा घेण्याची इच्छा आपला असा जीव घेईल अशी पुसटशी कल्पना देखील त्याच्या मनात नव्हती. कुलरमध्ये बिघाड असल्याने त्याला यात विजेचा जोरदार झटका बसला. शॉक लागल्याने तो जमिनीवर कोसळला. मुलाचा आवाज ऐकून त्याच्या कुटुंबातील व्यक्ती धावत त्याच्या जवळ आल्या.

शॉक लागल्याचं समजताच त्यांनी मेन स्विच ऑफ केलं आणि गणेशला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे. मुलाच्या मृत्यूने त्याच्या घरातील सर्व व्यक्तींवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, सुकळी गावामध्ये घडलेल्या या घटनेनंतर गावकरी घरामध्ये कुलर लावण्यासाठी घाबरत आहेत. कुलम किंवा अन्य कोणतीही विजेवर चालणारी वस्तू व्यवस्थित वापरणे गरजेचे असते. त्यात काही बिघाड झाल्यास दुरुस्त केले नाही की त्यातून शॉक लागण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांनी कुलर किंवा अन्य विजेवर चालणाऱ्या वस्तू वापरताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Hingoli News
Kalyan Crime : शेतीच्या वादातून कुटुंबाला मारहाण; शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, तिघेजण ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com