राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. एकीकडे दुष्काळी संकट असताना बँकेच्या कर्जाने देखील शेतकरी हैरान झाला आहे. हिंगोलीतील एका शेतकऱ्याने बँकेचे कर्ज फेडण्यासाठी अवयव विक्रीला काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आम्हाला बँकेचे कर्ज फेडायचे आहे, त्यासाठी आम्हा शेतकऱ्यांची किडनी ९० हजार रुपये, लिव्हर ७५ हजार रुपये, डोळे २५ हजार रुपयांना विक्री करायचे आहेत, कुणाला खरेदी करायचेत का? असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बँकेकडून घेतलेल्या पीक कर्जाची स्वाभिमानाने परतफेड करायची आहे. मात्र कर्ज फेडण्यासाठी आपल्याजवळ रक्कम उपलब्ध नसल्याने आपण शरीरातील अवयव विक्रीला काढल्याचं शेतकरी गजानन कावरखे यांनी म्हटलं.
हिंगोली जिल्ह्यात मागील सहा महिन्यात शेकडो शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल जीवन संपवलं. आता तर बँकेचे कर्ज फेडण्यासाठी जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाने स्वतःच्या शरीरातील अवयव विक्रीला काढले आहेत. शेतकऱ्याचा हा निर्णय सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. (Latest Marathi News)
ठाकरे सरकार कोसळल्यानंतर नव्याने सत्तेत आलेलं शिंदे-फडणवीस सरकार नेहमी शेतकऱ्यांच्यासोबत असल्याचा दावा करतंय. एका मुख्यमंत्र्यांसह राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे सरकार शेतकऱ्यांचे असल्याचं सांगत आले आहेत. (hingoli)
मात्र याच सरकारच्या काळात, कर्जाची रक्कम फेडण्यासाठी स्वतःच्या शरीरातील अवयव विकण्याची दुर्दैवी वेळ बळीराजावर आली आहे. बळीराजाच्या या निर्णयामुळे आता तरी सरकार शेतकऱ्यांसाठी काही ठोस भूमिका घेणार की राज्यातल्या बळीराजाला वाऱ्यावर सोडणार हे पहावं लागणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भारतीय जनता पक्षाच्या राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे. कर्जफेडीसाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे पण राज्यातील भाजपा सरकारला त्याची लाज वाटत नाही, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.