Hindu Temples News: मंदिराजवळील मांस, दारू विक्रीवर बंदी घाला; महाराष्ट्र मंदिर महासंघाचं मोठं पाऊल

राज्यातील सर्वच मंदिरांपासून काही अंतरावर मांस आणि दारु विक्री करणे बंद करण्यात येणार आहे.
Hindu Temples News
Hindu Temples NewsSaam TV
Published On

Temples News: काही दिवसांपूर्वी राज्यातील ३०० मंदिरांमधील भाविकांसाठी कठोर ड्रेस कोड लागू केल्यानंतर आता महाराष्ट्र मंदिर महासंघ आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्यातील सर्वच मंदिरांपासून काही अंतरावर मांस आणि दारु विक्री करणे बंद करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र मंदिर महासंघ राज्यभरातील विविध मंदिर व्यवस्थापनांच्या सर्वोच्च संस्थांमध्ये ५०० मीटरच्या आत मांस आणि मद्यविक्रीवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी गोव्यात (Goa) संपन्न झालेल्या सात दिवसीय अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनात महाराष्ट्र मंदिर महासंघाने हा निर्णय घेतला.

Hindu Temples News
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: दोन महिलांमधील भांडणाने घेतला कुत्र्याचा जीव; नेमकं काय घडलं?

राज्यातील प्रमुख वैष्णव मंदिर तसेच राज्यातील सर्व ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठे यावर लक्ष केंद्रित करून सदस्य लवकरच मांस आणि दारु बंदीची मोहीम सुरू करणार आहेत. जैन तीर्थक्षेत्रांजवळ या आधीपासूनच अशा प्रकारची बंदी लागू करण्यात आली आहे.

सर्व मंदिरे (Temples) पवित्र आहेत. धार्मिक स्थळांजवळ मांस आणि मद्य विकणे म्हणजे त्यांच्या पावित्र्याशी तडजोड करण्यासारखे आहे. केंद्र आणि स्थानिक राज्य सरकारने जैन मंदिरांजवळ या वस्तूंच्या विक्रीवर बंदी घातली आहे. यामुळे आम्हाला सर्व तीर्थक्षेत्र सुरक्षित करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यास प्रोत्साहन मिळालं आहे, असं महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी यावेळी म्हटलं.

Hindu Temples News
Dress Code In Temples: भाविकांसाठी महत्वाचं! राज्यातील ११४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू; मंदिर महासंघाची माहिती

यासाठी संबंधित शिष्टमंडळ राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडे ही लेखी मागणी करणार आहेत. यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची देखील भेट घेतली जाणार आहे. पंढरपूर, आळंदी, देहू आणि पैठण या ठिकाणी प्रमुख लक्ष्य केंद्रीत केले जाईल. तर भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, नागनाथ, वैजनाथ रेणुका देवी मंदिर आणि ज्योतिर्लिंग यांच्यावर देखील लक्ष्य दिले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com