Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू एकत्रिकरण समितीच्या वतीने नामांतराच्या समर्थनार्थ आज मोर्चा काढण्यात आला आहे. शहरातील क्रांती चौक ते औरंगपुरा या मार्गादरम्यान हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात छत्रपती संभाजीनगर नावाच्या समर्थनार्थ अनेक पक्षाच्या आणि संघटनांच्या नेत्यांनी सहभाग घेतला आहे.
हिंदू जनगर्जना मोर्चाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे आणि संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. क्रांती चौकात हिंदू जनगर्जना मोर्चातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
गेल्या तीन आठवड्यापांसून छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने होत आहेत. नामांतराची घोषणा झाली त्यावेळी सर्वप्रथम एमआयएमने याला विरोध करत आंदोलन सुरू केले. त्यानंतर काही मुस्लीम संघटनांनीही नामांतराला विरोध करत आंदोलन सुरु केले होते.
आता नामांतराच्या समर्थनार्थ आंदोलनांना सुरुवात झाली आहे. परवा मनसेकडून समर्थनार्थ मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तेव्हा मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आज शहरातील आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटना आणि राजकीय पक्षांकडून जनगर्जना मोर्चा काढण्यात आला आहे. (Latest Marathi News)
या जनगर्जना मोर्चात 50 हजारांहून अधिक नागरिक सहभागी होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी परवानगी दिली नसतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात हा मोर्चा काढण्यात आला आहेत.
पवानगी नसताना मोर्चा
यापूर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील परवानगी नसताना कँडल मार्च काढला होता आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले. त्यामुळे एकाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय अशी भूमिका का असे म्हणत हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा क्रांती चौकातून औरंगपुऱ्यात महात्मा फुले चौकापर्यंत जाणार आहे. याठिकाणी महात्त्मा फुलेंच्या पुतळ्यासमोर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. (chhatrapati Sambhajinagar News)
खा. इम्तियाज जलील यांचे नाव मिटवले
दरम्यान, क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवताना मान्यवरांची नावं असलेला एक दगडी फलक लावण्यात आला होता. त्यावर असलेले खासदार इम्तियाज जलील यांचे नाव मोर्चेकऱ्यांनी काळ्या शाईने मिटवून टाकले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.