Pune Accident: पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात! १५ फूटांवरून कोसळली प्रवाशांनी भरलेली बस

Accident News: मुंबईतून-बंगळुरूकडे जाणारी बस पुण्यातील चांदणी चौक परिसरात आल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्यावरून खाली कोसळून अपघात झाला.
Pune Accident News
Pune Accident NewsSaam tv

Pune Accident News: पुण्यातील चांदणी चौक परिसरात खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यावरून १५ ते २० फूट खाली कोसळ्याची घटना घडली आहे. या अपघातात ८ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतून-बंगळुरूकडे जाणारी खासगी बस पुण्यातील चांदणी चौक परिसरात आल्यानंतर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्यावरून खाली कोसळून हा अपघात झाला. या आपघातात ८ ते १० प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.

शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. ही बस शर्मा ट्रॅव्हल्सची असल्याची माहिती आहे. बावधन येथे मुख्य रस्त्यावरुन सर्व्हिस रोडवर जाताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस १५ ते २० फूट खाली कोसळली.

Pune Accident News
CM Eknath Shinde Sabha : खेडमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा, उद्धव ठाकरे निशाण्यावर?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये ३५ प्रवासी प्रवास करत होते. अपघातात बसमधील ८ प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी कोथरुड परिसरातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातामुळे चौंदणी चौक परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. जवळपास अर्ध्या तासानंतर या ठिकाणची वाहतूक सुरळीत झाली. (Latest Marthi News)

Pune Accident News
Ratnagiri Politics : मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच रत्नागिरीत शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

दरम्यान, अपघात झालेल्या परिसरातील रस्त्याच्या कडेला दिव्यांचा अभाव आहे, त्यामुळेच हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याठिकाणी अपघाताच्या घटना वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. तसेच प्रशासनाने तातडीने या परिसरात दिवे बसवावेत अशी मागणी देखील येथील नागरिकांकडून केली जात आहे. (Accident News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com