Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Mumbai BMC Polls: मुंबईत महायुतीत हायहोल्टेज ड्रामा रंगलाय.. भाजपनं शिंदेसेनेची कोंडी कऱण्यासाठी अनोखी खेळी केलीय.. भाजपची ही खेळी नेमकी काय आहे.. आणि शिंदेसेनेचा किती जागांचा प्रस्ताव भाजपनं धुडकावलाय ?
BJP and Shinde Sena leaders amid growing tension over seat sharing for the upcoming Mumbai BMC elections.
BJP and Shinde Sena leaders amid growing tension over seat sharing for the upcoming Mumbai BMC elections.Saam Tv
Published On

महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महायुतीतील शिंदेसेना आणि भाजपच्या नेत्यांच्या बैठकांना जोर आलाय.. त्यातच शिंदेसेनेनं आधी 125 आणि नंतर शिवसेनेनं 2017 मध्ये जिंकलेल्या 84 जागांचा दिलेला प्रस्ताव भाजपनं फेटाळून लावलाय.. तर शिंदेसेनेला मुंबईत केवळ 56 जागांचा प्रस्ताव भाजपनं दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीय... मात्र भाजप आणि शिंदेसेनेत कसा पेच निर्माण झालाय..

मुंबईत भाजप-शिंदेसेनेत पेच?

2017मध्ये जिंकलेल्या 82 जागा स्वतःकडे ठेवण्यावर भाजप ठाम

आधी 125 तर त्यानंतर ठाकरेंनी जिंकलेल्या 84 जागांची शिंदेसेनेकडून मागणी

ठाकरेसेनेच्या जुन्या 84 जागा शिंदेंना सोडण्यास भाजपचा स्पष्ट नकार

भाजपकडून शिंदेसेनेला केवळ 56 जागांचा प्रस्ताव

जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ

जागांच्या आकड्याबाबत वरिष्ठ पातळीवर अजूनही एकमत नाही

मात्र शिंदेसेनेनंही भाजपच्या दबावाला न जुमानता थेट स्वबळाची तयारी सुरु केलीय.. मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी शिंदेसेनेनं इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केलीय...यासंदर्भात शिंदेसेनेनं सारवासारव केलीय..

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र महायुतीत जागा वाटपावरुन मतभेद असल्याची बातमी फेटाळून लावलीय..

खरंतर 2017 मध्ये राज्यात युती असतानाही भाजप आणि शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली... त्यावेळी कोणत्या पक्षाने किती जागा जिंल्या होत्या..

शिवसेना- 84

भाजप- 82

काँग्रेस 31

राष्ट्रवादी - 09

समाजवादी पक्ष- 6

मनसे 7

एमआयएम- 2

इतर- 6

यापैकी सध्या भाजपकडे 84 तर शिंदेसेनेकडे 58 माजी नगरसेवक आहेत..त्याचाच आधार घेत भाजपनं शिंदेसेनेला 56 जागांचा प्रस्ताव दिलाय.. आता शिंदेसेना भाजपचा प्रस्ताव स्वीकारणार की किमान 84 जागा तरी पदरात पाडून घेणार... याकडे राज्याचं लक्ष लागलंय... मात्र महायुतीच्या जागा वाटपाचं शेवटपर्यंत भिजत घोंगडं राहिल्यास त्याचा फायदा ठाकरे बंधूंना होण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com