सांगली - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळा वरून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विरुद्ध भाजप (BJP) मध्ये उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने हाय अलर्टची भूमिका घेतली आहे. स्मारकाच्या ठिकाणी तगडा पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात दाखल करण्यात आल्या आहेत. तर स्मारकाच्या भोवती उंच पत्रे उभारून बाजू झाकली आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. तसेच स्मारकाच्या सोहळ्या बाबत कुपवाडसह बामणोलीमध्ये बैठका घेणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.
हे देखील पहा -
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळा 2 एप्रिलला शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी आज 27 तारखेला मेंढपाळच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडेल अशी घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजप मध्ये जुंपली आहे.
दरम्यान, सुमारे 30 हजार चौरस फुटांच्या भूखंडावर महापालिकेने विजयनगर परिसरात अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारले आहे. या स्मारकाचे काम 2010 पासून सुरू होते. आता या स्मारकाचे काम पूर्ण झाले असून यासाठी अडीच कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. या जागेवर अहिल्यादेवींचे स्मारक, वाचनालय, अतिथिगृह त्यासोबाबतच खुल्या जागेत बागही तयार करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.