ब्लॉक केलेले रस्ते 24 तासात खाली करण्याचे आदेश 1 सप्टेंबरला दिले. आंदोलकांनी रस्ते तर खाली केले. मात्र मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि मुद्दा आणखीनच चिघळला...अखेर तीन याचिकांवर एकत्रित सुनावणी घेत कोर्टानं जरांगेंनाच मैदान सोडण्याच फर्मान काढलं..
मुंबईत जी परिस्थिती निर्माण झाली ती सहन करण्यासारखी नाही
राज्य सरकारकडून देखील काही त्रुटी झाल्या, हे फारच गंभीर आहे
कोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारने काय पावलं उचलली ?
दुपारी 3 वाजेपर्यंत जागा खाली करा आणि आम्हाला कळवा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून काम करु
मात्र यामुळे सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं....फौजफाट्यासह पोलीस थेट आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना झाले. मात्र आंदोलक मैदान सोडण्याच्या मनस्थितीत नव्हते...पोलीस आंदोलकांना लाऊड स्पीकरवरून आवाहन करत होते....मात्र जरागें पाटलांनी आणि आंदोलकांनी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याची ठाम भूमिका घेतली...
मात्र तीन वाजेपर्यंत आंदोलकांना हटवण्यात पोलिसांना अपयश आलं....कोर्टात पुन्हा तीन वाजता सुनावणी सुरू झाली...यावेळी मात्र कोर्टानं जरांगे आणि राज्य सरकारवरही जोरदार ताशेरे ओढले...
हायकोर्टच्या आदेशानंतरही जरांगे मैदानात
हायकोर्ट
तुम्हाला परवानगी नसतानाही तुम्ही मुंबईत आलात
सतीश माने शिंदे (जरांगे वकील)
आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत कुठेही नुकसान झाले नाही
हायकोर्ट
आंदोलनकर्त्यांना केवळ आझाद मैदानात परवानगी होती
तुम्ही सतत नियमांच उल्लंघन करत आहात
महाधिवक्ता
जरांगे यांना नोटीस देऊन मुंबई सोडण्याचे आवाहन करावे
लोकांना त्रास व्हायला नको
हायकोर्ट
50 हजारपेक्षा जास्त लोक रस्त्यावर फिरतायत
योग्य वेळीच पाऊल का नाही उचलले?
आंदोलकांना तत्काळ निघून जाण्यास सांगा, परवानगीशिवाय थांबणे चुकीचे
मात्र हाय़कोर्टानं ओढलेल्या ताशेऱ्यांनंतरही पोलिसांना कोर्टाला अपेक्षित असलेली अंमलबजावणी करता आली नाही. मात्र दुसरीकडे सरकारनं थेट जीआर काडण्याच्या हालाचाली केल्यामुळे पोलिसांवरचा ताण कमी झाला आणि कोर्टाचाही सन्मान राखला गेला. मात्र आता 3 सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीत कोर्ट आणि काय म्हणतं आणि यापुढे होणाऱ्या आझाद मैदानातल्या आंदोलनांसाठी नवी मार्गदर्शिका तयार करणार का याबाबत उत्सुकता लागलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.