Buldhana Rain Update : भोगावती नदीला महापूर; लव्हाळा ते साखरखेर्डा रस्ता वाहतुकीस बंद

खडकपूर्णा नदीला पूर आला आहे.
buldhana, sindhkhedraja , rain update
buldhana, sindhkhedraja , rain updatesaam tv
Published On

बुलढाणा : सिंदखेडाराजा तालुक्यात दहा तासापासून अतिवृष्टी (rain) होत आहे. तालुक्यातील सर्व नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहे. नद्यांना पूर आला आहे. साखरखेर्डा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या भागातील भोगावती नदीला (river) महापूर आला आहे. त्यामुळे लव्हाळा ते साखरखेर्डा मार्ग रात्रीपासून बंद झाला आहे. (Buldhana Rain Update)

सिंदखेडराजा तालुक्यात जाेरदार पाऊस झाला. या भागात सुमारे 75 मिली मीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातून वाहणारी भोगावती नदीला महापूर आला आहे. परिणामी लव्हाळा ते साखरखेर्डा मार्ग रात्रीपासून बंद झाला आहे. या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. तालुक्यातील सर्व तलाव अगोदरच भरलेले आहेत. कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहात आहे त्यामुळे गावात पाणी शिरले असून समाशनभूमी व महादेव मंदिरात पाणी शिरले आहे.

साखरखेर्डा गावा शेजारी असलेल्या महालक्ष्मी तलावाच्या सांडव्यातून पाण्याचा निचरा होत आहे. वार्ड क्रमांक सहा मधील कालव्या शेजारील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. कालव्या शेजारी घर बांधकाम केलेल्या कुटुंबांनी सुरक्षीत स्थळी जावे असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

buldhana, sindhkhedraja , rain update
Bhusawal Wardha Passenger : भुसावळ - वर्धा पॅसेंजर हाेणार सुरु; जाणून घ्या वेळापत्रक

दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यातील बहुतेक प्रकल्प फुल्ल झाले आहेत. यातील जिल्ह्यातील सर्वात मोठा खडकपूर्णा प्रकल्प फुल्ल भरला असून धरणाचे 13 दरवाजे उघडले आहेत. देऊळगावराजा परिसरात 112 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. या धरणातून 14 हजार 196 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे खडकपूर्णा नदीला पूर आला आहे.

नदी काठच्या 36 गावांना धोका निर्माण झाला आहे. परिणामी नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशास्नाच्या वतीने देण्यात आले आहे. नदीला पूर आल्याने नदीपात्र सोडून पाणी किनगावराजा शिवारातील शेतात शिरले आहे. त्यामुळे सोयाबीन पूर्ण पाण्याखाली गेली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

buldhana, sindhkhedraja , rain update
Pimpri Chinchwad : गर्लफ्रेंडसमोर मारहाण झाल्यानं युवकानं केली आत्महत्या; एकावर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com