Vidarbha Heat Wave : सावधान! आजपासून विदर्भातील उष्णतेची लाट आणखी वाढणार; हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Vidarbha Weather Report : विदर्भातील तापमानात साधारणपणे 2 ते 3 अंशाने आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काल नागपूरतील तापमान 42.6 अंश सेल्सीअस असल्याची नोंद झाली होती.
Vidarbha Weather Report
Vidarbha Heat Wave Saam TV

पराग ढोबळे, साम टीव्ही

राज्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. अशात आजपासून विदर्भ आणखी तापण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस उष्णतेची लाट राहील असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यामुळे नागरिकांना आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे.

Vidarbha Weather Report
Heat Wave : जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट; तापमान पोहचले ४६ अंशावर, नंदुरबारच्या तापमानात वाढ

तापमानात आणखी वाढ

विदर्भातील तापमानात साधारणपणे 2 ते 3 अंशाने आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काल नागपूरतील तापमान 42.6 अंश सेल्सीअस असल्याची नोंद झाली होती. विदर्भातील सर्वाधिक तापमान हे अकोला जिल्ह्यातील आहे. अकोल्यात 45.8 अंश तापमान नोंदवले गेलं आहे.

विदर्भातील विविध जिल्ह्यांमधील तापमानाची नोंद

वाशीम - 44.2

गडचिरोली - 42.8

चंद्रपूर - 43.4

चंद्रपूर - 43.4

भंडारा 42.3

गोंदिया 41.8

यवतमाळ 44.5

वर्धा - 44.2

अमरावती 44

बुलढाणा 41.5 अंश तापमान काल दीवसभरात नोंदवले गेले आहे.

यवतमाळात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान

यंदाच्या उन्हाळ्यात काल 44.5 आणि रात्रीचे तापमान 28.5 अंश सेल्सिअस उच्चांकी पातळीवर गेल्याची प्रथमच नोंद झाली. कालचा दिवस यवतमाळमधील सर्वात उष्ण दिवस आणि रात्र ठरली. गेल्या सहा दिवसात यवतमाळमध्ये तापमान 4.4 अंशांनी विक्रमी वाढ झालीय. सरासरीच्या तुलनेत 4 अंशांनी तापमान जास्त राहिले. तीव्र उष्णतेमुळे दुपारी रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता.

एकीकडे उष्णता वाढत आहे तर दुसरीकडे पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाई निर्माण झालीये. पश्चिम विदर्भातील 86 गावात 91 टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. 436 विहिरीचे अधिग्रहण करून तात्पुरत्या उपाय योजना केल्या गेल्यात. सर्वाधिक पाणी टंचाई बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात असल्याचं समजलं आहे.

पश्चिम विदर्भात घोटभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. टँकरवर आमि विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी उफाळत आहे. पश्चिम विदर्भात केवळ 25.48 टक्के जलसाठा शिल्लक आहे. तर बुलढाणा जिल्हात सर्वाधिक 67 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विदर्भात सूर्य आग ओकत असल्याने पाण्याचे स्रोत आटले. तर विहिरीने तळ गाठलाय. मे महिन्याच्या अखेर पश्चिम विदर्भातील 200 गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार असल्याचा अंदाज आहे.

Vidarbha Weather Report
Weather Update : पाकिस्तानी वाऱ्यांमुळे महाराष्ट्र तापला; अनेक ठिकाणी पारा चाळीशीपार, उष्णतेच्या लाटेचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com