Bhandara: भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक 46 अंश तापमानाची नोंद, नागरिकांनी अशी घ्यावी काळजी; प्रशासनाचे आवाहन

Bhandra Heat Wave: यावर्षी भंडारा जिल्ह्यामध्ये उष्माघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. सध्या वातावरणात बदल झाला असला तरी नागरिकांनी उन्हापासून सरंक्षण करण्यासाठी टाेपीचा, छत्रीचा वापर करावा.
heat wave in bhandara recorded highest temperature yesterday
heat wave in bhandara recorded highest temperature yesterday Saam Tv

- शुभम देशमुख

संपूर्ण विदर्भात भंडारा जिल्ह्यातील तापमान सर्वाधिक राहिले आहे. यावर्षीही सर्वाधिक तापमानाचा दिवस म्हणून 31 मे ची नोंद झाली आहे. हवामान खात्याने शुक्रवारपासून भंडारा जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तीन जूनपर्यंत हा येलो अलर्ट राहणार आहे. यादरम्यान तासी 30 ते 40 किलाेमीटरने उष्ण लहरी प्रवाहित होणार असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

हवामान खात्याने नागरिकांना उष्मघातापासून सावध राहण्यासाठी दुपारी 12 ते 4 दरम्यान आवश्यक नसल्यास बाहेर पडू नये. काही कामानिमित्त बाहेर जाण्याची वेळ आल्यास पांढरे कपडे घालून डोक्यावर टोपी, स्कार्फ, गॉगल यांचा उपयोग करावा.

heat wave in bhandara recorded highest temperature yesterday
Sangli: वादळी वाऱ्याने दाेनशे विद्युत खांब पडले, 8 दिवसांपासून जतचा पूर्व भाग अंधारात

नागरिकांनी ज्यास्तीत जास्त पाणी प्यावे. कोल्ड्रिंक, चहा, कॉपी, दारू, नॉनव्हेज मसाले भाज्या टाळाव्यात. प्रकृती अस्वस्थ वाटल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जनावरांना थंड हवेच्या ठिकाणी ठेवावे असे आवाहन हवामान खात्यामार्फत नागरिकांना करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

heat wave in bhandara recorded highest temperature yesterday
Success Story: किन्हाळा तांड्यात दिवाळी साजरी, दिव्यांग लक्ष्मी राठोडची एमपीएससीत बाजी; ग्रामस्थांनी वाजतगाजत काढली मिरवणूक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com