Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू

Yavatmal News: यवतमाळमध्ये सख्ख्या बहीण-भावाचा पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. आई-वडील कामावर गेले असताना ही घटना घडली. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू
Yavatmal newsSaam Tv
Published On

Summary -

  • यवतमाळमध्ये सख्खा भाऊ-बहिणीचा पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला.

  • यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात ही घटना घडली.

  • प्रियांका (१०) आणि कार्तिक (८) हे मंगळवारी बेपत्ता होते आज त्यांचे मृतदेह सापडले.

  • आई-वडील कामावर गेले असताना ही घटना घडली

संजय राठोड, यवतमाळ

यवतमाळमध्ये हृदयद्रावक घटना घडली. सख्या भाऊ-बहिणीचा खड्ड्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील महागांव कसबा येथे घडली. आई-वडील कामावर गेले असता ही दोन्ही मुलं खेळता खेळता पाण्याने भरलेल्या खड्ड्याजवळ गेले. या खड्ड्यात पडून दोघांचाही मृत्यू झाला. मंगळवारपासून हे दोघेही बेपत्ता होते. त्यामुळे सर्वजण त्यांचा शोध घेत होते. आज सकाळी खड्ड्यामध्ये त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. या घटनेमुळे यवतमाळमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू
Yavatmal Rain: पैनगंगा नदीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, यवतमाळ- नांदेडदरम्याची वाहतूक ठप्प, दोन जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथे ही घटना घडली. साईनगरी लेआऊटमध्ये पाण्याने भरलेल्या खड्ड्यामध्ये पडून सख्या भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दारव्हा-आर्णी रोडला लागून असलेल्या या लेआऊटमध्ये दहा फूट खोल खड्डे खोदण्यात आले होते. या खड्ड्यांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाण्याने तुडुंब भरलेल्या खड्ड्याकडे ही दोन्ही मुलं गेली होती. ही मुले पोहण्यासाठी खड्ड्यात उतरली असावीत किंवा त्या खड्ड्यात पडून त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू
Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यात १० सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश; सण- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

प्रियांका गणेश राठोड (१० वर्षे) आणि कार्तिक गणेश राठोड (८ वर्षे) अशी मृत्यू झालेल्या सख्ख्या बहीण-भावांची नावं आहेत. मंगळवारी ही मुलं घरून बेपत्ता झाली. दुपारच्या सुमारास ही हदयविकारक घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अशा धोकादायक खड्ड्यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी या निमित्ताने होत आहे.

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू
Yavatmal : तलठ्याची शेतकऱ्यांशी अरेरावी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, अतिवृष्टीच्या यादीवरून वाद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com