Mumbai Goa Highway Toll News : 'या' कारणामुळे हातिवले टोलनाका बंद; पालकमंत्री उदय सामंतांचा महत्त्वपूर्ण निर्णय (पाहा व्हिडीओ)

यापुर्वी देखील स्थानिकांनी तसेच माजी खासदार निलेश राणेंनी यांनी सगळं काम झाल्यानंतर टाेल घ्यावा अशी मागणी केली हाेती.
uday samant, mumbai goa highway toll, hativale toll plaza
uday samant, mumbai goa highway toll, hativale toll plazasaam tv
Published On

Mumbai Goa Highway Hativale Toll Plaza : मुंबई गोवा महामार्गावरील (mumbai goa highway) राजापूर तालुक्यात दाेन दिवसांपासून सुरु झालेला हातिवले टोल नाका (hativale toll) स्थानिकांच्या विराेधानंतर पुन्हा बंद करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. दरम्यान महामार्गाचे काम सुरु हाेण्यापुर्वीच टाेल आकारणी केली जात असल्याचे वृत्त साम टीव्हीने प्रसारित केले हाेते. (Maharashtra News)

uday samant, mumbai goa highway toll, hativale toll plaza
Video पाहा : महाराष्ट्रात Corona चा विळखा; Pandharpur च्या विठुरायाच्या दर्शनाला निघालात ? थांबा ! नवा नियम वाचा

स्थानिकांना या टाेलमधून 70 टक्के सूट देण्यात आली हाेती. परंतु या मार्गावरील 20 किलाेमीटरच्या अंतराचे काम अर्धवट राहिले हाेते. त्यामुळे 56 किलाेमीटरपर्यंतची टाेल आकारणी सुरु केल्याचे टाेल प्रशासनाने स्पष्ट केले हाेते. मात्र स्थानिकांना टाेल माफी हवी असल्याने त्यास विराेध वाढू लागला आहे.

uday samant, mumbai goa highway toll, hativale toll plaza
Gautami Patil In Satara : गौतमी पाटीलच्या अदाकारीने जावलीकर घायाळ; शिवेंद्रराजेंना आग्रह अन्... (पाहा व्हिडीओ)

ग्रामस्थांना हवीय टाेल माफी

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले जोपर्यंत स्थानिकांचे समाधान होणार नाही, तोपर्यंत टोल आकारणी केली जाणार नाही. ग्रामस्थांना 11 किलोमीटर इकडे आणी तिकडे टोल माफी हवी आहे. तसेच काम पुर्ण झाल्यानंतर टाेल सुरु करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांच्या मनमानीला विरोध आहे. ग्रामस्थांशी याबाबत चर्चा झाली असून सध्या तरी टाेल आकारणी केली जाणार नाही असेही उदय सामंत यांनी साम टीव्हीशी बाेलताना स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com