Maratha Reservation : हसन मुश्रीफ यांना मराठा बांधवांनी भरस्त्यात अडवत घातला घेराव, राजीनाम्याची केली मागणी, VIDEO

Kolhapur Hasan Mushrif News : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीम यांना देखील मराठा समाजाच्या संतापाचा सामना करावा लागला आहे.
Hasan Mushrif
Hasan MushrifSaam TV
Published On

रणजीत माजगावकर

Maratha Andolan :

मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव आक्रमक झाले आहे. राज्य सरकारला दिलेली डेडलाईन संपल्यानंतर ठिकठिकाणी मराठा समजाकडून आंदोलने केली जात आहे. तर राज्यातील नेत्यांनी देखील मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. नेत्यांना अनेक ठिकाणी मराठा बांधवांना प्रवेशबंदी केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीम यांना देखील मराठा समाजाच्या संतापाचा सामना करावा लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या गारगोटीत मराठा समाजाने हसन मुश्रीफ यांची गाडी अडवली आणि घेराव घातला. मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने फसवल्याची भावना नागरिकांना व्यक्त केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हसन मुश्रीफ यांनी देखील मराठा समाजाच्या भावना समजून घेतल्या आणि लवकरच मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. मराठा आंदोलकांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. गारगोटी येथे आजपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे.

भाजप खासदाराची गाडी फोडली

नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना देखील मराठा बांधवांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर गुरुवारी रात्री नांदेड येथील कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात गेले होते. खासदार चिखलीकर गावात आल्याचं लक्षात येताच गावकरी आक्रमक झाले.

आरक्षण दिल्याशिवाय आमच्या गावात पाय ठेवू नका, असं म्हणत संतप्त आंदोलकांनी चिखलीकर यांना घेरलं. यावेळी संतप्त आंदोलकांनी चिखलीकर यांच्या ताफ्यातील दोन गाड्या देखील फोडल्या. दरम्यान, मराठा समाजाच आक्रमक झाल्याचं लक्षात येताच चिखलीकर यांनी तातडीने अंबुलगा गावातून काढता पाय घेतला.

Hasan Mushrif
Manoj Jarange Patil: मराठ्यांची पोरं मोठी होऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं षडयंत्र, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

अजित पवारांना बारामतीत प्रवेशबंदी?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील प्रवेश बंदीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत मराठा समाजाने प्रवेश बंदी केली आहे. मराठा क्रांती मोर्चाने तसं आवाहन अजित पवार यांना केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com