H3N2 Outbreak: पुणेकरांनो काळजी घ्या! मार्चमध्ये शहरात आढळले H3N2 विषाणूचे 46 रुग्ण, एकाचा मृत्यू

H3N2 virus News : पुण्यात H3N2 चा वेगाने फैलाव होत असून मार्चमध्येच म्हणजे गेल्या 16 दिवसात 46 रुग्ण आढळून आले आहेत.
H3N2 Outbreak
H3N2 Outbreaksaam tv
Published On

H3N2 Outbreak In pune : कोरोनानंतर देशासमोर आता नव्या विषाणूचं संकट उभं राहिलं आहे. देशात H3N2 विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना राज्यात देखील या विषाणूचा वेगाना फैलाव होत आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यासह इतर काही शहरांमध्ये देखील H3N2 विषाणूचे रुग्ण आढळून येत आहे. धक्कादायक म्हणजे पुण्यात एका 67 वर्षांच्या व्यक्तीचा H3N2 सह comorbidity ने मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत या विषाणूने 6 बळी घेतले आहेत.

पुणेकरांना काळजी घेण्याचे आवाहन

पुण्यात H3N2 चा वेगाने फैलाव होत असून मार्चमध्येच म्हणजे गेल्या 16 दिवसात 46 रुग्ण आढळून आले आहेत तर आतापर्यंत एकूण १६२ रुग्णांची नोंद पुण्यात करण्यात आली आहे. तसेच एका 46 वर्षीय रुग्णाचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांना प्रशासानाकडून काळजी घेण्याचे आणि आरोग्यविषयक योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

H3N2 Outbreak
Sangli News: H3N2 चे जिल्‍ह्यात आढळले पाच रुग्ण

देशात 9 जणांचा मृत्यू

राज्यात या विषाणूचा मुंबई आणि पुण्यासह इतर शहरांमध्ये देखील प्रादुर्भाव होत आहे. देशभरात आतापर्यंत या विषाणूमुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे, विशेष एकट्या महाराष्ट्रात या विषाणूने 6 जणांचा बळी घेतला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 1, पुण्यात 1, अहमदनगरमध्ये 1, अकोल्यात एकाचा आणि नागपूरमध्ये 2 जणांचा H3N2 विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. (Latest Marathi news)

आरोग्यमंत्र्यांचं काळजी घेण्याचं आवाहन

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. H3N2 रुग्ण वाढत आहेत. त्याबाबात सर्वे करणं आणि लोकांना सजग करणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, हात धूत राहणे, तसेच अंगदुखी आणि ताप यासारखे लक्षणं आढळ्यास 48 तासांच्या आत डॉक्टरांना भेटून त्यांच्या सल्ल्याने औषध घेणे हा यावर उपाय आहे असे सावंत म्हणाले.

H3N2 Outbreak
H3N2 Virus: २३ वर्षीय विद्यार्थ्याचा H3N2 ने मृत्‍यू; अहमदनगरमध्‍ये प्रशासन सतर्क

H3N2 विषाणूची लक्षणं

- ताप

- घसा खवखवणे

- तीव्र खोकला

- वाहणारे नाक आणि शिंका येणे

- थकवा

- स्नायू आणि शरीर वेदना

विषाणूपासून स्वत:चे संरक्षण कसे करावे (Pune News)

- हात साबणाने स्वच्छ धुवा.

- वारंवार डोळ्यांना स्पर्श करणे टाळा.

- घराबाहेर पडताना चांगल्या दर्जाचे मास्क वापरा.

- शिंकताना किंवा खोकलताना तोंड आणि नाक झाका.

- अंगदुखी किंवा ताप आल्यास पॅरासिटामॉल घ्या.

- अधिकाधिक द्रवपदार्थ पित राहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com