एकमेकांची कॉलर पकडून धू धू धुतलं, उपसरपंच आणि गावकऱ्यांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी, पाहा VIDEO

Freestyle Fight In Dhule: धुळ्यामध्ये गटारावरून वाद झाला. या वादानंतर उपसरपंच आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान त्यांनी एकमेकांना मारहाण केली. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
एकमेकांची कॉलर पकडून धू धू धुतलं, उपसरपंच आणि गावकऱ्यांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी, पाहा VIDEO
Freestyle Fight In DhuleSaam Tv
Published On

धुळ्यामध्ये उपसरपंच आणि गावकऱ्यांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. धुळ्याच्या शिंदखेडामध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गटारीच्या खोदकामावरून हा वाद झाला. सुरूवातीला शाब्दीक वाद झाला. त्यानंतर उपसरपंच आणि गावकऱ्यांनी एकमेकांची कॉलर पकडून धू धू धुतलं. या घनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात येणार्‍या गटारीच्या कामावरून उपसरपंच आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला. उपसरपंच आणि गावकऱ्यांमधील वाद इतका उफाळला की या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे दिसून आले. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच जाणीवपूर्वक खासगी मालकीच्या जागेतून अतिक्रमण असल्याचे म्हणत गटारीसाठी खोदकाम करत असल्याचा आरोप संबंधित ग्रामस्थांनी लावला आहे.

गटारीच्या कामाचा वाद इतका वाढला की भररस्त्यात उपसरपंच आणि गावकऱ्यांनी एकमेकांना मारहाण केली. या फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ समोर आला आहे. या हाणामारीत महिला देखील दिसत आहेत. आता हे प्रकरण नरडाणा पोलिस ठाण्यात पोहचले. या प्रकरणाचा तपास नरडाणा पोलिस अधिकारी करत आहेत. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

एकमेकांची कॉलर पकडून धू धू धुतलं, उपसरपंच आणि गावकऱ्यांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी, पाहा VIDEO
Jalgaon Crime : सोशल मीडियावरून मैत्री; भेटायला बोलावून नेले रूमवर, तरुणीवर अत्याचार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com