Gujarat Leopard : सावधान! महाराष्ट्रात गुजरातच्या बिबट्यांचा शिरकाव? नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Gujarat Leopard Release Attempt : गुजरात वनविभागाने जेरबंद केलेले बिबटे महाराष्ट्राच्या हद्दीत सोडण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी महाराष्ट्र वनविभागाची बोटदेखील वापरली. या कृत्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.
Gujarat attempts to release leopards in Maharashtra
Gujarat attempts to release leopards in MaharashtraSaam Tv
Published On

सागर निकवाडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Gujarat Leopard : गुजरातने महाराष्ट्राच्या हद्दीत बिबट्या सोडल्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून परवानगी न घेता गुजरात वनविभागाने त्यांच्या राज्यात जेरबंद केलेले बिबटे महाराष्ट्रात सोडण्याचा प्रयत्न केला. यासाठी गुजरातच्या वनविभागाने विनापरवानगी महाराष्ट्र शासनाची बोट वापरली.

नर्मदा विकास विभागाने या संदर्भात माहिती दिली आहे. गुजरात वनविभाग नेहमीच महाराष्ट्र शासनाची विनापरवानगी बोट वापरत असल्याची माहिती नर्मदा विकास विभागाने म्हटले आहे. परवानगी नसताना ही बोट गुजरातने कशी वापरली असा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे. याप्रकरणी नंदुरबार वनविभागाने प्रतिक्रिया देणे टाळले आहे.

गुजरात वनविभाग महाराष्ट्राच्या हद्दीत नर्मदा काठावर बिबट्यांसह मगरीसुद्धा सोडत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. बिबट्या आणि मगरींमुळे नर्मदा काठावरच्या आदिवासी बांधवांना धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनेला पाच दिवस झाले तरी नंदुरबार वनविभागाच्या वतीने कोणताही प्रतिसाद न आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Gujarat attempts to release leopards in Maharashtra
Bird Flu : बर्ड फ्लूचा धोका वाढतोय; ठाण्यात २१ कोंबड्या, २०० अंडी केली नष्ट

या संदर्भात नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या लतिका राजपूत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बिबट्या, मगरी सोडून गुजरात आणि महाराष्ट्र राज्य सरकार आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकाराला स्थानिकांकडून प्रचंड विरोध होत आहे.

Gujarat attempts to release leopards in Maharashtra
Shahapur Crime : भर दिवसा महिलांच्या गळ्यातील दागिने घेऊन पसार; शहापूर तालुक्यात चोरांचा धुमाकूळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com