पालकमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाचा दिलासा; ९ मेपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर

रस्त्याच्या कामात अपहार केल्याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Bachchu Kadu
Bachchu KaduSaam Tv
Published On

जयेश गावंडे

अकोला: राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना अकोला सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. बच्चू कडू यांच्याविरोधात रस्त्याच्या कामात अपहार केल्याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आज अकोला सत्र न्यायालयात सुनावणी झाली. बच्चू कडू यांची न्यायालयात बाजू ऍड. बी .के. गांधी यांनी मांडली. बच्चू कडू यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Bachchu Kadu
Bachhu Kadu Viral Video | ...तर मी माझे स्वतःचे हात कलम करेन !;बच्चू कडू यांचे मोठे वक्तव्य

अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रस्त्यांच्या कामांमध्ये अपहार केल्याच्या तक्रारीवरून न्यायालयाने त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. कोतवाली पोलिसांनी यामध्ये बुधवारी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पालकमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी अकोला सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. अकोला सत्र न्यायालयाने पालकमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना ९ मे पर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद करण्यात आला, मात्र सत्र न्यायालयाने पालकमंत्री बच्चू कडू यांच्या वकीलांची बाजू मान्य करीत त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून पालकमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu)यांनी १ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com