नजर हटी, दुर्घटना घटी! पर्यटनस्थळी नवरदेव तिकीट काढण्यास गेला अन् इकडे नववधू...

यामुळे नवरदेवासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
Aurangabad News
Aurangabad NewsSaam Tv
Published On

औरंगाबाद - कोणतीही ओळख नसताना केवळ मध्यस्थाच्या सांगण्यावरून लग्न करणे एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात ही घटना घडली आहे. लग्नानंतर तिसऱ्या दिवशी नवदाम्पत्य दौलताबाद किल्ल्यावर फिरायला गेले असता, तिकीट काढायला गेलेल्या नवऱ्याची नजर चुकवून नववधूने दागिन्यांसह एका कारमधून धूम ठोकली.

यामुळे नवरदेवासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी दौलताबाद पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथे राहणारा राजेश प्रकाश लाटे हा तरुण लग्नासाठी वधूच्या शोधात होता. यादरम्यान त्याची ओळख असलेल्या जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बबन म्हस्के याने ओळखीची एक मुलगी असल्याचे सांगितले.

हे देखील पहा -

बबन म्हस्के याने त्याची ओळख अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील नवरीची मावशी आशाबाई भोरे या महिलेसोबत करून दिली. या दोघांच्या मध्यस्थीने जळगाव जिल्ह्यातील प्रभाकर शिंदे यांची मुलगी शुभांगीसोबत राजेश लाटे याचा विवाह ठरला. यासाठी त्याला मुलीच्या नातेवाइकांना १ लाख ३० हजार रुपये द्यावे लागले. सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर शुभांगीशी २६ मार्च २०२२ रोजी राजेशने दौलताबाद येथील दत्तमंदिरात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.

Aurangabad News
किरीट सौमय्यांच्या अडचणीत भर? RTI कार्यकर्त्याकडून धक्कादायक माहिती उघड

नवरी शुभांगीच्या अंगावर ७० हजार रुपयांचे दागिने घातले. शिवाय लग्नाचा सर्व खर्चही केला. लग्नानंतर २७ मार्च रोजी नवदाम्पत्य देवदर्शन करून आले. २९ मार्च रोजी सत्यनारायणाची महापूजा झाल्यानंतर ते दोघे देवगिरी किल्ला पाहण्यासाठी गेले. मात्र, तेथून नववधू शुभांगीने दागिन्यांसह पोबारा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com