Gram Panchayat Elections 2022 : राज्यतील ग्रामपंचायतीच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी आज रविवार 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. तर 20 डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विविध जिल्ह्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी हे मतदान होत आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. या ग्रामपंचायतीत (Gram Panchayat) मतदार राजा कुणाच्या हाती कल देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अशात साताऱ्याच्या एका मतदाराची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. याचं कारणंही तसचं आहे. स्वतःचं लग्न असतानाही 'आधी मतदान मग लग्न' असं ठरवून नवरदेव प्रसाद सदाशिव निगडे यांनी लग्नाच्या मांडवात जायच्या आधी चक्क मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. (Latest Marathi News)
शिरवळ येथे वार्ड क्रमांक दोन साठी येथील कन्या शाळेत या नवरदेवाचे मतदान होते. दुपारी तीन वाजता स्वतःचे लग्न असताना, घरात लग्नाची लगीनघाई असतानाही वेळात वेळ काढुन आपल्याला घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार प्रथम बजावयचा असा मनोदय त्यांनी केला. त्याप्रमाणे लग्न मंडपात जाण्याआधी लग्नासाठीचा सर्व वेष परिधान करुन हा नवरदेव मतदानासाठी हजर झाला. (Maharashtra News)
आज सातारा जिल्ह्यातील 259 ग्रामपंचयतीची निवडणूक पार पडत आहे. बऱ्याच वेळा मतदारांना अनेक अमिष दाखवून मतदानासाठी आणावं लागत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परंतु मतदान ही आपली जबाबदारी आहे असे समजून या नवरदेवाने समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.