Sant Sahitya Sammelan: अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला खालापुरमध्ये शानदार प्रारंभ

Sant Sahitya Sammelan: ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करीत टाळ आणी मृदुंगाच्या ठेक्यावर नाचत संत साहित्याची दिडी काढण्यात आली.
Sant Sahitya Sammelan:
Sant Sahitya Sammelan:राजेश भोस्तेकर
Published On

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र आयोजित 10 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला आज रायगड जिल्ह्यातील खालापुरमध्ये शानदार प्रारंभ झाला. 22 आणि 23 जानेवारी असे दोन दिवस हे संमेलन (Sahitya Sammelan) चालणार आहे. संपुर्ण महाराष्ट्रातुन वारकरी संप्रदायाच्या दिंडी या संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी आल्या आहेत. ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करीत टाळ आणी मृदुंगाच्या ठेक्यावर नाचत संत साहित्याची दिडी काढण्यात आली. या संमेलनाला महसुलमंत्री बाळासाहेब थोरत (Balasaheb Thorat) उद्घाटक म्हणुन उपस्थित राहणार आहेत. (Great start to All India Marathi Sant Sahitya Sammelan in Khalapur)

हे देखील पहा -

कर्जत खालापूर (Karjat - Khalapur) तालुक्याला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. रायगडात खालापूर येथे पहिल्यांदाच वारकरी साहित्य परिषद होत आहे. दि. २२ व २३ जानेवारी रोजी खालापुर तालुक्यातील देवन्हावे अखिल भारतीय वारकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असुन कोरोना नियमांना अधिन राहुन कार्यक्रमाचे आयोजन अगदी कमी उपस्थिती मध्ये दोन दिवसात केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. आज 22 जानेवारी रोजी आमदार महेद्रं थोरवे याच्या हस्ते साहित्य दिडीं शुभांरभ झाला. परिषदेचे उदघाटन महसुल मंत्री बाळासाहेब थोरात याच्या हस्ते होणार असुन मावळचे खासदार अप्पा बारणे, हभप अशिष महाराज उपस्थित राहणार आहेत.

Sant Sahitya Sammelan:
Nagpur Crime: सर्जा राजाच्या नावावर 'रात्रीस खेळ चाले'; बंद शामियान्यात 'न्युड डान्स'

उद्या 23 जानेवारीला सांगता समारोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पाटोले यांच्या उपस्थितीत होणार असुन पालकमंत्री अदिती तटकरे हे या परिषदेचे स्वागताध्यक्ष आहेत. तसेच जेष्ठ पत्रकार जब्बार पटेल व श्यामसुदंर सोनार यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. वारकरी सप्रंदायचे अध्यक्ष विठ्ठल पाटील (काकाजी) व सचिन सदांनद मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी कोरोनाच्या नियमांना अधिन राहुन कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मेहनत घेत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com