akola , akot , mohali river
akola , akot , mohali riversaam tv

पुल ओलांडण्याचे धाडस बेतलं जिवावर; आजोबांचा मृतदेह हाती, नातवाचा शाेध सुरु

नदी, नाल्यांना पुर आल्याने नागरिकांनी पुल ओलांडण्याचे जिवघेणे धाडस करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Published on

Akola News : पुलावरून पाणी वाहत असताना पुल ओलांडण्याचे जिवघेणे धाडस दोघांच्या अंगावर बेतले आहे. मोहाळी नदीवरील पूल ओलांडत असताना आजोबा आणि नातू दोघेही जण नदीच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेत आजोबांचा मृत्यू झाला असून नातवाचा शोध सुरु आहे. ही घटना अकोला जिल्ह्यातील अकोट (akot) तालुक्यातल्या तांदूळवाडी-सोनबर्डी नदीच्या (river) पुलावर घडली. स्थानिक ग्रामस्थ आणि शोध बचाव पथकाकडून नातवाचा शोध सुरू आहे. (akola latest marathi news)

प्रभाकर प्रल्हाद लावणे आणि त्यांचा नातू आदित्य विनोद लावणे हे दोघेही जण आज (मंगळवार) पहाटे म्हैस घेवून सोनबर्डी गावात गेले होते. दोघे परतीच्या मार्गावर असताना मोहाळी नदीवरील पूल ओलांडत होते. मिळालेल्या माहितीनुसार प्रभाकर यांचा नातू आदित्य हा नदीच्या प्रवाहात वाहून जात होता. त्याला वाचवण्यासाठी आजोबांना प्रयत्न केले. मात्र तेही देखील नदीच्या प्रवाहात वाहून गेले.

या घटनेची माहिती तांदूळवाडी गावकऱ्यांना मिळताच त्यांनी नदीच्या स्थळी भेट दिली. दोघांनाही शोधण्यास सुरुवात केली. या दरम्यान प्रभाकर लावणे यांचा मृतदेह हाती लागला आहे. तर नातू आदित्य अजूनही बेपत्ता आहे त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान घटनास्थळी अकोट तहसीलदार निलेश मडके आणि अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख, पोलीस कर्मचारी भास्कर सांगळे दाखल झाले आहेत.

akola , akot , mohali river
Nagar Beed Highway : पुण्याहून नांदेडला निघालेल्या बसला अपघात; 24 जखमी, चार गंभीर

या घटनेची माहिती मिळताच लावणे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सध्या संपूर्ण कुटुंब नदीच्या स्थळी दाखल झालं आहे. पुराच्या पाण्यात आजोबा आणि नातू वाहून गेल्यामुळे तांदूळवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेला नागरिकांनी प्रशासनाला जबाबदार धरले आहे. तांदूळवाडी सोनबर्डी नदीच्या परिसरात थोडा जरी पाऊस पडला तरी देखील हा पूल पाण्याखाली जातो. याचे कारण म्हणजे या पुलाची उंचीच खूप कमी आहे.

ही स्थिती असल्यामुळे प्रशासनाने पाऊस पडल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करायला हवा हाेता असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र सोनबर्डी आणि तांदूळवाडी वाहतुकीसाठी हाच एक पर्याय मार्ग असल्याने अनेकदा नागरिक आणि विद्यार्थ्यांना यामधून जीवघेणा प्रवास करावा लागतो.

प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळेच दोघे वाहून गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, सोनबर्डी आणि तांदूळवाडी या रस्त्याच्या कामाला मंजुरी देखील मिळाली असून अद्यापही प्रशासनाने काम सुरू केले नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

Edited By : Siddharth Latkar

akola , akot , mohali river
तुषार गुंजाळ हत्या प्रकरणी शिंदे, चिकणेला अटक; साथीदारांचा शाेध सुरु

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com