Dance Video: नादच खुळा! आजोबांनी नातवंडांसोबत धरला ठेका, स्टेप्स एकदा बघाच

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका आजोबांचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात आजोबांचा डान्स पाहून प्रत्येक नेटकऱ्यांनी कौतुकस्पाद प्रतिक्रीया केलेल्या आहे.
Viral Video
Dance VideoSaam Tv
Published On

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडिओत कधी महिलांचा राडा असतो तर कधी शाळेतील मुलांची हाणामारी. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ काहीसा हटके आहे, ज्यात एका आजोबांचा धम्माकेदार डान्स आहे.

डान्स(Dance) करण्यासाठी कोणतीही जागा आवश्यक नसते शिवाय कोणताही प्रसंग असो कशाचीची आवश्यकता नसते. सध्या व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत ही एका आजोबांचा डान्स आहे. जो पाहून डान्स करण्यासाठी वयाचीही मर्यादा आवश्यक नाही हे समजून येते. आजोबांच्या डान्सच्या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्हाला लहानापासून ते मोठ्या वयोगटातील व्यक्ती दिसून येत आहे. या व्हिडिओ एका आजोबा आहेत जे लहान मुलांसह डान्स करताना धम्माकेदार डान्स करताना दिसून येत आहे. त्यांच्या आजूबाजूला असलेले सर्व व्यक्तीही या गाण्याच्या धुनवर डान्स करताना दिसत आहेत. नक्की व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे आणि कोणत्या कार्यक्रमाचा, सणाचा आहे हे समजू शकलेले नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर या आजोबांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील '@vanraj_chauvan'या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ साधारण १६ ऑगस्ट रोजी पोस्ट करण्यात आला असून व्हिडिओला आतापर्यंत ७८ हजाराहून अधिक नेटकऱ्यांनी पसंती दर्शवलीआहे. इतकेच नव्हे तर व्हिडिओला लाखोच्या संख्येने व्ह्यूज मिळत आहेत. आजोबांचा व्हिडिओ नेटकऱ्यांनी अन्य सोशस मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर करण्यात आलेले आहे. शिवाय व्हिडिओ पाहून अनेकांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Video
Aisharya Narkar Dance: 'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी.....' गोकुळाष्टमीनिमित्त ऐश्वर्या नारकर यांचा सुंदर नृत्याविष्कार; VIDEO पाहाच

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com