Monsoon Session : राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) आज दूसरा दिवसही व वादळीच ठरणार असल्याचे दिसत आहे. भाजपाच्या 12 आमदारांच्या निलंबना विरोधात भाजपाने सभागृहाबाहेर अभिरुप विधानसभा स्थापन करून कामकाज सुरू केले. (Government's action on the Legislative Assembly, live broadcast off)
यावरून भास्कर जाधव सभागृहात आक्रमक झाले असून त्यांनी तात्काळ भाजपची सभा बंद करण्याची आणि भाजप नेत्यांना विधानसभेच्या आवाराच्या बाहेर काढण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील सभा बंद करण्याची आणि सुरक्षा अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली.
यांनंतर भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून खुर्चीवर बसले. त्यांनी तात्काळ अभिरुप विधानसभेचे माईक, स्पीकर जप्त करण्याचे आदेश दिले. यानंतर विधी मंडळ परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. अभिरुप विधानसभेवर कारवाई केल्याने भाजपा नेत्यानी परिसरात घोषणाबाजी केली.
त्यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण तयार झाले असून आम्ही सरकार विरोधात बोलणार यांचे पितळ उघडे पडणार, कितीही दहशत माजवली तरी आम्ही आमचा आवाज बंद करणार नाही, असे त्यांनी म्हटले. तर, सभाअध्यक्ष्यांच्या आदेशावरुन प्रसिद्धी माध्यमांच्या लोकांनाही धक्काबुक्की केली जातेय, ही हुकूमशाही आहे, असे आरोपही त्यांनी केले आहेत. राज्यसरकारला लोकशाहीची चाड राहिली नाही. सत्ताधारी पक्ष विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.