Monsoon Session : विरोधी पक्षाची सभागृहाबाहेर अभिरुपविधानसभेची स्थापना

अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Monsoon Session : विरोधी पक्षाची सभागृहाबाहेर अभिरुपविधानसभेची स्थापना
Monsoon Session : विरोधी पक्षाची सभागृहाबाहेर अभिरुपविधानसभेची स्थापना twitter/ @BJPMahrashtra

Monsoon Session : राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) आज दूसरा दिवस आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज होणाऱ्या अधिवेशनाच्या कामकाजात कोणते प्रस्ताव (Proposal) मांडले जातील आणि कोणते पारित होतील असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच, काल तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (भास्कर जाधव ) यांनी भाजपच्या आमदारांवर केलेली कारवाई राहणार की सरकार मागे घेतली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Opposition BJP set up a Legislative Assembly outside the House)

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहातील सभागृहांतील गैरवर्तन आणि थेट अध्यक्षांनाच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्यामुळे भास्कर जाधव यांनी काल भाजपाच्या 12 आमदारांच्या निलंबनाची कारवाई केली. अशातच आज दुसऱ्या दिवशी विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षाने आजच्या अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. तसेच, १२ आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजपने सभागृहाबाहेर प्रतिविधानसभा स्थापन केली आहे. तर कालिदास कोळंबकर भाजपच्या प्रतिविधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर विरोधी पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सभागृहाच्या बाहेरच आंदोलन सुरू केले आहे. राज्यससरकार विरोधी पक्षनेत्याना आपली बाजू मांडून देत नसल्याचा आरोपही यावेळी फडणवीस यांनी केलं आहे.

Monsoon Session : विरोधी पक्षाची सभागृहाबाहेर अभिरुपविधानसभेची स्थापना
शिक्षण विभागाचा युटर्न; शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती

तसेच, राज्यात शेतकरी, ओबीसी, मराठा, मागासवर्गीयांचे, विद्यार्थी, एमपीएससीचे, विम्याचे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांवर या विरोधी पक्षाने आवाज उठवला तर खोट्या आरोपाखाली आमदारांना निलंबित करण्यात आलं. अध्यक्षांचा खुर्चीवरुन खोट बोलून या ठिकाणी आमदारांना निलंबित केलं. म्हणून आज या प्रतिविधानसभेत मी या सरकाच्या धिक्काराचा आणि निषेधाचा प्रस्ताव याठिकाणी ठेवत असून आपण या प्रस्तावावर चर्चा सुरु करून या जुलूमी सरकारविरोधात आपली भूमिका मांडण्याची संधी द्यावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com