Inter-Caste Marriage: आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या पाठीशी सरकार ठाम! तब्बल इतक्या कोटींची आतापर्यंत दिली आर्थिक मदत

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या पाठीशी सरकार ठाम! तब्बल इतक्या कोटींची आतापर्यंत दिली आर्थिक मदत
Inter-Caste Marriage
Inter-Caste MarriageSaam TV
Published On

Inter-Caste Marriage: समाजातील जातीव्यवस्था नष्ट व्हावी, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, तसेच अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाहित जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेसाठी केंद्र सरकारचा 50 टक्के व राज्य शासनाचा 50 टक्के या प्रमाणात निधी दिला जातो.

या योजनेंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस माहे जून 2023 मध्ये 27 कोटी 31 लाख 76 हजार रुपये एवढा निधी शासनाने मंजूर केला आहे.

Inter-Caste Marriage
Pandharpur News: मुख्यमंत्री शिंदेंचं फू बाई फू, पंढरपुरात विखेंसोबत घेतला फुगडी खेळण्याचा आनंद

हा निधी क्षेत्रीय कार्यालयांना खर्च करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला असून त्यात मुंबई विभाग 4 कोटी 39 लाख 68 हजार, पुणे विभाग 5 कोटी 33 लाख 50 हजार, नाशिक विभाग 5 कोटी 79 लाख 50 हजार, अमरावती विभाग 3 कोटी 86 लाख 50 हजार देण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

तर नागपूर विभाग 6 कोटी 52 लाख, औरंगाबाद विभाग 64 लाख 50 हजार, लातूर विभाग 76 लाख 8 हजार याप्रमाणे निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीतून 5,460 पेक्षा अधिक जोडप्यांना लाभ मिळणार आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे आयुक्त, डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.

Inter-Caste Marriage
Chandrayaan 3: चांद्रयान-3 मोहिमेची तारीख ठरली! या दिवशी अवकाशात झेपावणार, भारतासाठी अभिमानाचा क्षण

या योजनेंतर्गत प्रति जोडप्यास रुपये 50 हजार अर्थसहाय्य देण्यात येते. ही रक्कम पती-पत्नी यांच्या संयुक्त नावाने देण्यात येते. ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन व शिख या प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com