छगन भुजबळ तलाठी कधीपासून झाले....हे गोपिनाथ मुंडेंच्या वारसाच्या मुद्द्यावरुन खोचक टोला लगावलाय मनसे नेते प्रकाश महाजन यांनी....बीडच्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात गोपिनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंनी चालवावा, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळांनी केलं... आणि हेच वक्तव्य पंकजा मुंडेंचे मामा आणि मनसे नेते प्रकाश महाजन यांना चांगलंच खटकलंय... तर भुजबळ हेच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या नात्यात मीठाचा खडा टाकत असल्याचा टोला मनसे नेते प्रकाश महाजनांनी लगावलाय...
गोपिनाथ मुंडेंच्या वारशावरुन वाद पेटल्यानं मनोज जरांगेंच्या हाती आयतं कोलित मिळालंय.. ज्यांनी बापाचा अपमान केला त्यांच्यासोबत फिरताना खऱ्या वारसदाराला काहीच वाटत नाही का? असा सवाल करुन जरांगेंनी पंकजा मुंडेंनाही डिवचलंय.. हे कमी होतं की काय? आता करुणा मुंडेंनीही या वादात उडी घेत ना भाऊ ना बहीणी, आता फक्त करुणा वहिनी म्हणत आपणच गोपिनाथ मुंडेंचे वारसदार असल्याचं म्हटलंय..
खरंतर गोपिनाथ मुंडे हयात असताना धनंजय मुंडेंनी त्यांना साथ दिली... मात्र 2009 च्या विधानसभेच्या उमेदवारीवरुन वारसाच्या मुद्द्यावरुन वादाची पहिली ठिणगी पडली...
2009 मध्ये गोपिनाथ मुंडेंनी धनंजय मुंडेंना डावलून पंकजा मुंडेंना परळी विधानसभेची उमेदवारी दिली.. त्यानंतर बहीण भावातील वाद आणखी चिघळला आणि त्यामुळेच 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी परळी नगरपालिकेत बंडखोरी करत उमेदवार उभे करत पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाला आव्हान दिलं.. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजांनी धनंजय मुंडेंचा पराभव केला... तर 2016 मध्ये पंकजा मुंडेंच्या भगवान गडावरील मेळाव्याला विरोध करत महंत नामदेव शास्त्रींनी अप्रत्यक्षपणे गोपिनाथ मुंडेंचा पंकजांकडील वारसा बेदखल केला...
आता अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत आल्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आले ... मात्र छगन भुजबळांनी आणि त्यानंतर करुणा मुंडेंनी गोपिनाथ मुंडेंच्या वारसाचा मुद्दा छेडल्याने हा वाद मुंडे बहीण भावात फूट पाडण्यासाठी आहे की पंकजा मुंडेंच्या खच्चीकरणासाठी याचीच चर्चा रंगलीय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.