'शेतक-यांच्या चळवळीचे यश'; गाेपीचंद पडळकरांवर गुलालाची उधळण

या बंदीमुळे खिलार जात नामशेष होत चालली होती पण आजच्या निर्णयाने आता ते हाेणार नाही अशी भावना शेतकरी आणि बैलगाडा मालकांनी व्यक्त केली.
gopichand padalkar
gopichand padalkar
Published On

सांगली : बैलगाडा शर्यतीस (bullock cart race) परवानगी मिळाली आणि आटपाडीसह सांगली (sangli) जिल्ह्यात बैलगाडा शर्यतप्रेमींनी गुलालाची उधळण करीत आनंदाेत्सव साजरा केला. भाजप नेते गाेपीचंद पडळकर यांना झरे ग्रामस्थांनी खांद्यावर घेत तसेच बैलगाडीतून गावात मिरवणुक काढली.

गाेपीचंद पडळकर म्हणाले राज्यातील शेतक-यांसह बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. न्यायालयात निर्णय झाला तरच राज्यात चांगलं हाेत आहे हे आज पुन्हा सिद्ध झालं आहे. महाराष्ट्रातील सरकार काहीच करीत नाही हे आज सिद्ध झालं. आम्ही झरे गावात एक माेठी स्पर्धा आयाेजित केली. सरकारने त्यावेळी स्पर्धा हाेऊ नये यासाठी प्रयत्न केले. परंतु स्पर्धेस मिळालेल्या प्रतिसादानंतर सरकारचे डाेळे उघडले. आज शेतक-यांच्या चळवळीला यश आले आहे.

gopichand padalkar
वकीलांच्या जिगरी प्रयत्नांमुळे न्याय मिळाला : सुनील केदार

दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर सांगलीत बैलगाडी प्रेमी आणि शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. कसबे डिग्रज येथे शेतकऱ्यांनी गुलालाची उधळण करत या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले. या बंदीमुळे खिलार जात नामशेष होत चालली होती पण आजच्या निर्णयाने आता ते हाेणार नाही अशी भावना शेतकरी आणि बैलगाडा मालकांनी व्यक्त केली.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com