गोंदिया : विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर गोंदिया रेल्वे विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून विना तिकिट रेल्वेत प्रवास करणाऱ्या 17 हजार लोकांवर गोंदिया रेल्वे विभागाने कारवाई करत तब्बल 87 लाखांचा दंड वसूल केला आहे. (Gondia railway department takes action against 17,000 people traveling without tickets)
हे देखील पहा -
दक्षिण-पूर्व-मध्य रेलवेच्या नागपुर मंडलाच्या अंतर्गत येणाऱ्या गोंदिया विभागात तिकीट तपासणी अभियान सुरु केले आहे. यात 1 ऑगस्ट पासून 20 ऑगस्ट पर्यंत सुरु असलेल्या कारवाईत तब्बल 18 हजार 15 लोकांकडून 87 लाख 33 हजार 230 रुपये वसूल केले आहे. विशेष म्हणजे विना तिकीट प्रवास करणाऱ्या 17 हजार 719 लोकांकडून 86 लाख 67 हजार 630 रूपये, तर कचरा करणाऱ्या 66 लोकांकड़ून 8 हजार 10 रूपये तर बिना मास्क फिरणाऱ्या 11 लोकांकडून 46 हजार 200 रुपये तसेच ध्रूमपान करणाऱ्या 59 लोकांकड़ून 11 हजार 400 रूपयाच्या दंडाचा रक्कमेचा समावेश आहे.
विशेष म्हणजे कोरोना नन्तर काही विशेष ट्रेन सुरु असून त्यात ही रिजर्वेशन मिळत नसल्याने प्रवासी वीणा तिकीट प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे।
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.