Gondia News : खेळता खेळता नदीकाठी गेले अन् अनर्थ घडला; दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर शोककळा

two brother drowned in nala : खेळता खेळता नदीकाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत झाला आहे. दोन्ही भावांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
खेळता खेळता नदीकाठी गेले अन् अनर्थ घडला; दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर शोककळा
Gondia News Saam tv
Published On

शुभम देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

गोंदिया : नागपूर, गोंदिया या भागात जोरदार पाऊस सुरु आहे. गोंदियामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोंदियातील पोगझरा गावात नाले तुडूंब वाहू लागले आहेत. या मुसळधार पावसादरम्यान गोंदियामध्ये अनर्थ घडला आहे. गोंदियातील पोगझरा गावातील नाल्यात एकाच कुटुंबातील दोन चिमुकले भाऊ वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दोघांच्या मृत्यूने सणासुदीच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पोगझरा गावातील नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने एकाच कुटूंबातील दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू झाला आहे. तीन वर्षीय रुद्र सुजित दुबे आणि दीड वर्षीय शिवम सुजित दुबे या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही भावांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

खेळता खेळता नदीकाठी गेले अन् अनर्थ घडला; दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर शोककळा
Pune Rain : भिडे पूल पाण्याखाली; रस्ता वाहतुकीसाठी बंद, पाहा VIDEO

गेल्या दोन दिवसांपासून गोरेगाव तालुक्यातील रात्रीच्या वेळी दमादर पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तर पोंगेझरा गावातून वाहणाऱ्या नाल्याला देखील पूर आला. तर शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास सुजित दुबे यांच्या घरासमोर असलेल्या नाल्याला पूर आला होता. यावेळी सुजित यांची दोन्ही मुले ही खेळता खेळता नाल्याकाठी गेले. त्यानंतर या नाल्याच्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदन करण्यात पाठविले. त्यानंतर कुटुंबीयांना देण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास गोंदिया ग्रामीण पोलीस करत आहे.

खेळता खेळता नदीकाठी गेले अन् अनर्थ घडला; दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर शोककळा
Pune Crime: पुण्यातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये, आता थेट संपत्तीवर होणार कारवाई

अमरावतीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान

अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे पिकांची पाहणी करून पीक विमा भरपाई मिळण्यासाठी पीक विमा कंपनीकडे 88 हजार शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केले आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन,तूर,उडीद, मुंग या पिकाचा समावेश आहे. यामध्ये बाधित पिकांचे संरक्षण करण्यात यावे आणि नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर विमा कंपनीच्या सर्व्हेअरकडून आतापर्यंत जिल्ह्यात 26 हजार सर्व्हे पूर्ण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com