Gondia News: १२ फूट खड्ड्यात अडकुन मजूराचा मृत्यू; भुयारी गटारीचे सुरू होते काम

१२ फूट खड्ड्यात अडकुन मजूराचा मृत्यू; भुयारी गटारीचे सुरू होते काम
Gondia News
Gondia NewsSaam tv
Published On

गोंदिया : शहरात नगरपरिषद सीमेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणवतीने भुमिगत गटार योजनेच्या काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. गुणवत्तेवर नागरीकांमध्‍ये रोष असतानाही पालिका (Gondia News) प्रशासनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करत आहे. या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज काम सुरू असताना मामा चौक परिसरात भूमिगत गटार योजनेच्या १२ फूट खड्ड्यात एक मजूर पडला. यानंतर त्याच्यावर मातीचा ढिग पडल्याने त्या मजुरांचा मृत्यू झाला आहे. (Live Marathi News)

Gondia News
Aurangabad News: मित्राची आई खड्ड्यात पडल्‍याने विद्यार्थ्यांनी जे केले ते अवाक करणारे; जेवणाच्या डब्यात माती आणली अन्‌

गोंदिया शहरातील मामा चौकाजवळ भुयारी गटार योजनेचे खोदकाम सुरू आहे. हे खोदकाम सुरू असताना यात एक मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्‍याने त्‍याचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया शहरत घडली आहे. यात सुरेश नेवारे (वय ४० वर्ष रा. गोविंदपूर) या मजुराचा मृत्‍यू झाला. दरम्‍यान गोंदियातील अनेक नागरिकांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यासह सर्वांनाच येथील बांधकामाची तक्रार केली होती. मात्र नगरपरिषदेचे प्रशासक, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांनी या तक्रारींकडे कानाडोळा करीत कंत्राटदाराचा बचाव करण्याचीच भूमिका घेतल्यामुळेच ही घटना घडल्याचे सिव्हिल लाईन, मामा चौक परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

कुटुंबीयांची आक्रमक भुमिका

काम करत असताना मंजूर खड्ड्यात पडल्याची माहिती नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशम दलालाच्या कर्मचाऱ्यांनी त्या कामगाराला बाहेर काढण्याकरिता कसोशीने प्रयत्न केले. सदर मजुराला १२ फिट खोल खड्ड्यात काम करायचे असून सुद्धा त्याला कोणतीही सुरक्षेची साधन पुरविली नव्हती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी येथे येऊन जोपर्यंत मृत मजुराच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये मोबदलाची घोषणा करीत नाही. तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही; अशी भूमिका मृतकाचे कुटुंबीयांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com