Aurangabad News: मित्राची आई खड्ड्यात पडल्‍याने विद्यार्थ्यांनी जे केले ते अवाक करणारे; जेवणाच्या डब्यात माती आणली अन्‌

मित्राची आई खड्ड्यात पडल्‍याने विद्यार्थ्यांनी जे केले ते अवाक करणारे; जेवणाच्या डब्यात माती आणली अन्‌
Aurangabad News
Aurangabad NewsSaam tv
Published On

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अंतर्गत रस्‍त्‍यांची दुरावस्‍था झालेली आहे. लोकप्रतिनिधी या खराब झालेल्‍या रस्‍त्‍यांकडे काही केल्‍या लक्ष देत नाही. अशात लहान– मोठे अपघात (Accident) कायम होत असतात. असेच रस्‍त्‍यावरील खड्ड्यांमुळे (Aurangabad News) महिला खाली पडली. आपल्‍या मित्राची आई खड्ड्यांमुळे पडली; यामुळे मुलांनी अनोखे पाऊल उचलले. (Letest Marathi News)

Aurangabad News
Nanded News: पैनगंगा नदीतील धोकादायक प्रवास संपणार; ४० वर्षांपासून होती प्रतिक्षा

शहराच्‍या अंतर्गत रस्‍त्‍यांचा प्रश्‍न केवळ औरंगाबादच नाही तर राज्‍यातील जवळपास सर्वच शहरात सारखा आहे. रस्‍त्‍यांवरील खड्ड्यांचा प्रश्‍न नागरीकांसाठी नेहमी डोकेदुखी ठरत असतो. या खड्ड्यांमुळे रोज होत असलेल्‍या अपघाताकडे लक्ष दिले जात नाही. स्‍थानिक लोकप्रतिनिधी देखील या समस्‍येकडे दुर्लक्ष करत असतात. अशात काही नागरीक स्‍वतःहून पुढाकार घेत खड्डे बुजवत असतात. असाच प्रत्‍यय औरंगाबादमध्‍ये आला असून यात नागरीक नव्‍हे, तर विद्यार्थी पुढे आले होते.

जेवणाच्या डब्यात माती भरून बुजले खड्डे

छत्रपती संभाजी नगरमध्ये शहरातील अंतर्गत काही रस्त्यांची अवस्था अतिशय दुर्दैवी आहे. अशातच मित्राची आई या खड्ड्यामुळे पडली असता शालेय विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जेवणाच्या डब्यात माती भरून ते खड्डे बुजायला सुरुवात केली, मित्राच्या आईला इजा झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी शाळा सुटल्यावर स्वतः मातीने हे खड्डे तब्बल १ तास वेळ देऊन बुजवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com