Gondia Accident News: दुचाकीला टीप्परची जोरदार धडक; मुलासमोरच आईने सोडले प्राण

Accident News: अपघातामध्ये २ महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर १ तरुण गंभीर जखमी झाला आहे.
Gondia Accident News
Gondia Accident Newssaam tv
Published On

Gondia News:

गोंदियामध्ये अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. भीषण अपघातात २ महिलांचा मृत्यू झाला आहे. तर एक तरुण यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी गावात हा अपघात घडल्याने परिसरात दु:खाचं वातावरण पसरलं आहे. (Latest Marathi News)

Gondia Accident News
Gondia News : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे अन्नत्याग आंदोलन; रस्त्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेसमोर उपोषण

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील गोरठा गावाजवळ हा भीषण अपघात घडलाय. या अपघातामध्ये २ महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर १ तरुण गंभीर जखमी झाला आहे. सत्यशिला बिसेन (३६), सुनीता बिसेन (४०) यांची ओळख पटली असून दुचाकी वाहन चालक दीपक ब्रिजलाल बिसेन (23) पोकेटोला (टेकरी) येथील रहिवासी असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

मृतक आपल्या मुलीच्या घरी असलेला कार्यक्रम आटपून घरी निघाले होते. जखमी तरुण दीपक ब्रिजलाल बिसेन हा आपल्या आईला आणि काकूला घेवून गावाकडे जात होता त्यावेळीच भरधाव टिप्परची दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेत दोन्ही जावा दुचाकीवरून वर फेकल्या गेल्या. तरुण देखील रस्त्याच्या कडेला फेकाल गेला. अपघातात आपल्या आईला आणि काकूला गमावल्याने तरुणावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अनेकदा आपली चूक नसतानाही नागरिकांना आपला जीव गमवावा लागतोय. वाहन चालवताना योग्या स्पीडमध्येच चालवले जाणे गरजेचे आहे. मात्र अनेक व्यक्ती वाहन चालवण्याचे नियम सर्रास धाब्यावर बसवतात. त्यामुळे भीषण अपघात घडतात. पोलीस झालेल्या अपघाताबाबत अधिक तपास करतायत.

Gondia Accident News
Ujjain Crime: घरच्यांशी वाद झाल्यानंतर उज्जैनाला होती अल्पवयीन पीडिता; तीन ऑटोमध्ये झाला अतिप्रसंग, ५ जणांना अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com