Gondia News : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे अन्नत्याग आंदोलन; रस्त्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेसमोर उपोषण

Gondia News : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे अन्नत्याग आंदोलन; रस्त्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेसमोर उपोषण
Gondia Zilha Parishad
Gondia Zilha ParishadSaam tv
Published On

शुभम देशमुख 

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम व मागास म्हणून सालेकसा तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यात अनेक कामे प्रलंबित आहेत. या समस्यांकडे (Zilha Parishad) जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या संदर्भात दिलेल्या निवेदनाचीही दखल घेण्यात आली नाही असा आरोप करत. जि.प. सदस्या विमल कटरे यांनी गोंदिया (Gondia) जिल्हा परिषद कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य रेखा फुंडे या देखील सहभागी झाल्या आहेत. (Tajya Batmya)

Gondia Zilha Parishad
Onion Price: कांदा उत्पादक शेतकरीचं ठरवणार आता कांद्याचा भाव; बाजार समितीला पर्यायी विक्री यंत्रणा

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील साखरीटोला ते तिरखेडी रस्त्याचे तात्काळ खड्डे भरण्याचे काम करावे व दोन महिन्यात नवीन रस्ता बनविण्यात यावा. रेल्वेने ना हरकत देऊन सुद्धा धानोली- बाभणी मार्गाचे काम झालेले नाही. ते पूर्ण करावे या मागण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका जिल्हा परिषद सदस्यांनी घेतली आहे.

Gondia Zilha Parishad
Chandrapur News : चंद्रपूरमध्ये एक कोटीची सुगंधित तंबाखू जप्त

श्रेय लाटण्याचा प्रयत्न; बांधकाम सभापती   

गोंदिया  जिल्हा परिषद सदस्या विमल कटरे यांनी बांधकाम विभागाला ११ सप्टेंबरला पत्र व्यवहार केल्यानंतर बांधकाम सभापती यांनी १३ सप्टेंबरला सदस्या विमल कटरे यांना मागणी केलेला रस्त्याला मान्यता दिली असल्याचे पत्र दिल्याचे सांगतिले आहे. तरी देखील विमल कटरे हे आंदोलना बसले असून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बांधकामं सभापती टेभरे यांनी सांगितले आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com