भुसावळ हत्याकांड : 5 हत्यांचा संशयित असलेला "गाेलू" गजाआड !

भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर ता. 6 आॅक्टाेबर 2019 राेजी हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला हाेता.
Golu Arrested
Golu Arrestedतरबेज शेख
Published On

तरबेज शेख

नाशिक : राज्याला हादरवून साेडणाऱ्या भुसावळ येथील पाच जणांच्या हत्येप्रकरणातील फरार प्रमुख संशयिताला नाशिक राेड पाेलिसांनी अखेर अटक केली आहे. अरबाज अजगर खान ऊर्फ गोलू खान असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून ताे अडीच वर्षांपासून पाेलिसांसह सीआयडीच्या (CID) हातावर तुरी देत हाेता. (Nashik Crime News)

भाजपचे नगरसेवक (BJP Corporator) रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर ता. 6 आॅक्टाेबर 2019 राेजी हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला हाेता. या हल्ल्यात त्यांचे भाऊ सुनील बाबूराव खरात (५५) व स्वत: रवींद्र बाबूराव खरात (५०), मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहीत उर्फ सोनू रवींद्र खरात (२०) व सुमित गजरे हे पाच जण ठार झाले हाेते. तसेच या हल्ल्यात इतर चारजण गंभीर जखमी झाले हाेते. या धक्कादायक घटनेमुळे भुसावळ शहर हादरून गेले हाेते. या गुन्ह्याचा तपास मुंबई सीआयडीकडे (Mumbai CID) वर्ग करण्यात आला होता. (BJP Corporator Killing Case, Bhusawal, Nashik)

Golu Arrested
नागपूरात आजपासून क्यूआर कोडवर आधारित 'स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम'; काय आहे ही सिस्टीम?

तेव्हापासून यातील प्रमुख अरबाज अजगर खान ऊर्फ गोलू खान हा फरार होता. त्यामुळे पोलिसांपुढे या संशयित गुन्हेगारास पकडण्याचे मोठे आव्हान होते. शुक्रवारी नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे हवालदार अनिल शिंदे, विशाल पाटील, विष्णू गोसावी, मनोहर शिंदे, राकेश बोडके, सोमनाथ जाधव, कुंदन राठोड, केतन कोकाटे, सागर आडणे जेलरोड पाण्याची टाकी परिसरात गस्त करत असतांना मनोहर शिंदे यांना संशयित अरबाज खान ऊर्फ गोलूची जेलरोड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.

हे देखील पहा-

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना कळवताच सेंट्रल जेल परिसरात सापळा रचण्यात आला. त्याचवेळी ताे पळून जात असतांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

नाशिकरोड पोलिसांनी (Nashik Police) कायदेशीर सोपस्कार उरकून त्यास पुढील चौकशीकामी सीआयडीच्या ताब्यात दिले आहे. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, निरीक्षक गणेश न्याहदे, राजू पाचोरकर, योगेश पाटील, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे व गुन्हे शोध पथकाने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com