Saptashrungi Gad Nashik: दसऱ्याला बोकड बळीचा वाद चिघळणार? महंतांपाठोपाठ अंनिसचाही बोकड बळी प्रथेला विरोध

Saptashrungi Gad News: बोकड बळीच्या प्रथेला नाशिकमधील महंतांपाठोपाठ अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही विरोध केला आहे.
Goat Sacrifice On Saptashrungi Garh
Goat Sacrifice On Saptashrungi GarhSaam TV
Published On

नाशिक: आद्य साडेतीनशक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील (Nashik) सप्तश्रुंगी गडावर (Saptashrungi Garh) दसर्‍याच्या दिवशी बोकडाची बळी (Goat Sacrifice) देण्याची शेकडो वर्षांची परंपरा होती. मात्र २०१६ साली एका घटनेमुळे प्रशासनाने या प्रथेवर बंदी आणली होती. आता तब्बल ५ वर्षांनी ही प्रथा पुन्हा सुरू होणार आहे. उच्च न्यायालयाकडून काही अटी-शर्तींसह बोकडाच्या बळीसाठी परवानगी दिली आहे. यामुळे भाविकांमध्ये उत्साह आहे तर, इथल्या महंतांमध्ये मात्र, याबाबत नाराजी आहे. बोकड बळीच्या प्रथेला नाशिकमधील महंतांपाठोपाठ अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही विरोध केला आहे. (Nashik Latest News)

Goat Sacrifice On Saptashrungi Garh
Parbhani Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत १३ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू; दोन जण जखमी

२०१६ साली बोकडबळी दरम्यान न्यासाच्या वतीने मानवंदना देताना झाडण्यात आलेल्या बंदुकीच्या गोळीतील छरे लागून काही भाविक जखमी झाले होते. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रथेला बंदी घातली होती. मात्र, श्रद्धेची बाब असल्याने आदिवासी विकास संस्था, सुरगाणा या संस्थेने या बंदी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत गुरवारी, २९ सप्टेंबरला उच्च न्यायलयाने सप्तश्रुंगी गडावरील बोकडबळी हा परांपरिक आणि धार्मिक विधी असल्याचे मान्य करत बोकडबळीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र न्यायालयाच्या परवानगीनंतर नाशिकच्या साधू महंतांनी या बोकड बळीला विरोध केला आहे. (Maharashtra News)

धर्म शास्त्रातील पुराव्यांचा संदर्भ देत साधू महंतांकडून बोकड बळीला विरोध करण्यात आला आहे. दसऱ्याला बोकड बळी दिला गेला, तर आम्ही आमरण उपोषण करु असा इशारा महंत अनिकेत शास्त्रींनी प्रशासनाला दिला आहे. आमरण उपोषणाचा इशारा तर बोकड बळीविरोधात अंनिसही मैदानात उतरली आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते टी. आर. गोराणे यांनी बोकड बळी बंद करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे यंदा नाशिच्या सप्तश्रृंगी गडावर बोकड बळीचा वाद पेटण्याची शक्यता आहे. (Tajya Batmya)

Goat Sacrifice On Saptashrungi Garh
Shirdi Sai Baba Punyatithi 2022 : 'साईं' च्या पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ; साईबाबांच्या जीवनावर उभारला देखावा

२०१६ साली नेमकं काय घडलं होतं?

२०१६ साली दसर्‍याच्या दिवशी बोकड बळी देण्याचा विधी सुरू असतांना सप्तश्रुंगी गडावरील सुरक्षा रक्षकाकडे असलेल्या रायफलमधून नजरचुकीने गोळी सुटली होती. सुदैवाने ही गोळी थेट कुठल्याही भविकाला न लागता भिंतीवर आदळली. मात्र गोळी भिंतीवर आदळल्यानंतर गोळीचे आवरण फुटून त्याचे छर्रे भाविकांच्या अंगावर उडाले. यासर्व घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली, किंवा कुठल्याही भविकाला गंभीर दुखापत झालेली नसली तरी १२ भाविक किरकोळ जखमी झाले होते. यानंतर झालेल्या चौकशीअंती अखेर तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण यांनी सर्व घटनेला बोकडबळीच्या विधी वेळी होणारा गोंधळ व हुल्लडबाजीला दोषी धरत बोकडबळीच्या परंपरेवरच बंदी टाकण्याचा निर्णय घेतला होता.

Edited By - Akshay Baisane.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com