चांदसैली घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच; काही काळ वाहतूक बंद

संबंधित विभागाने उपाययोजना करण्याची मागणी
चांदसैली घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच; काही काळ वाहतूक बंद
चांदसैली घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच; काही काळ वाहतूक बंददिनू गावित
Published On

नंदुरबार - तळोदा तालुक्यातून सातपुडा अतिदुर्गम भागातील धडगाव तालुक्याला जाण्यासाठी उपयोगात येणारा अतिमहत्त्वाचा चांदसैली घाट रस्त्यात दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद झाली होती. खाजगी वाहन चालकांच्या मदतीने रस्त्यावर आलेल्या मोठे दगड बाजूला करून रस्ता तात्पुरता सुरु केला असला तरी. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

हे देखील पहा -

या घाट रस्त्याचा धडगाव तालुक्यातील नागरिक तळोदा व नंदुरबार येथे येण्यासाठी वापर करतात. सदर रस्त्यावर तीव्र उतार व वळण घाट असल्याने हा रस्ता प्रवासासाठी धोकादायक आहे. प्रवाशांच्या मागणीनंतर तळोदा ते धडगाव दरम्यान मिनीबसची सुविधा सुरू करण्यात आली आहे. परंतु चांदसैली घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरू आहे. तसेच रस्ता देखील अत्यंत खराब झाल्याने प्रवासासाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने दुरुस्त करावी अशी मागणी देखील नागरिकांकडून केली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com