Gautami Patil: बेटा माझ्याशी दोन शब्द तरी बोल...; बाबांची साद गौतमी ऐकणार का?

Gautami Patil Father: खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या आडनावावरून वाद पेटला होता.
Gautami Patil
Gautami PatilSaam Tv
Published On: 

Gautami Patil News: ठसकेदार लावणी डान्सर गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमाक नेहमीच राडे होताना दिसतात. गौतमी आजवर तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या आडनावावरून वाद पेटला होता. अशात आता गौतमीच्या वडलांमुळे ती चर्चेत आली आहे. (Latest Marathi News)

प्रत्येक मुलीचं आपल्या वडिलांशी एक वेगळं आणि अनोखं असं नातं असतं. गौतमी सध्या तिच्या आईसोबत राहते. तिचे आई- बाबा विभक्त झाले आहेत. त्यामुळे ती गेल्या अनेक वर्षांपासून आईसोबतच राहत आहे. असे असले तरी गौतमी तिच्या आडनावामुळे वादात सापडल्यावर वडलांनी माध्यमांसमोर येत लेकीला भावनिक साद घातली आहे.

Gautami Patil
Mumbai Crime News: देवाला तरी सोडा रे...! गणेश मूर्तीची चोरी; काही तासांतच पोलिसांनी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

गौतमीच्या वडलांच नाव काय?

गौतमी पाटीलचे वडील रवींद्र नेरपगारे यांनी माध्यमांसमोर येत आपल्या लेकीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गौतमीचे वडील जळगावात राहतात. त्यांनी माध्यमांसमोर येत म्हटलं आहे की, "मला माझ्या लेकीची फार आठवण येते. मला तिच्याकडून काहीही नको. तिने फक्त एकदा येऊन मला भेटावं. माझ्याशी दोन शब्द बोलावेत, अशी इच्छा गौतमीच्या वडलांनी व्यक्त केलीये.

गौतमीचं आडनाव पाटीलच

गौतमीविषयी बोलताना तिचे वडील म्हणाले की, मला गौतमीचा फार अभिमान वाटतो. ती आणि तिची आई आम्ही पुन्हा एकत्र राहू. गौतमीचं आडनाव पाटीलच आहे. त्यामुळे ती हेच आडनाव लावणार, असं तिच्या वडलांनी म्हटलं आहे.

Gautami Patil
Tiger Viral Video: बाबो! चक्क तरुणीच्या अंगावर बसला वाघ अन्...; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ Viral

बाबांची साद ऐकणार का गौतमी?

बाबांचा हा व्हिडिओ समोर आल्यावर गौतमीच्या (Gautami Patil) खासगी आयुष्याविषयी आणखीनच चर्चा रंगू लागली. ती आपल्या बाबांना केव्हा भेटणार या प्रश्नाचं तिने स्वत: उत्तर दिलं आहे. आपल्या प्रतिक्रियेत तिने म्हटलं आहे की, हा माझा कौटुंबिक प्रश्न आहे. यावर मी आता काहीच बोलू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com