Ambernath: अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन

Garbage Piles: शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिकेने ऑगस्टमध्ये समीक्षा कंपनीला कचरा उचलण्याची जबाबदारी दिली होती, मात्र सात महिन्यांपासून कंपनीला देयके मिळाली नाहीत.
Ambernath
Ambernathsaam tv
Published On

अंबरनाथ शहरातील कचरा व्यवस्थापनावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पालिकेने ऑगस्ट महिन्यात शहरातील कचरा उचलण्याच्या जबाबदारीसाठी समीक्षा कंपनीची नेमणूक केली होती. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून पालिकेने संबंधित कंपनीला बिलच दिलेले नाही. परिणामी, ठेकेदाराच्या आर्थिक गणितावर मोठा परिणाम झाला असून, कर्मचाऱ्यांचे वेतनही रखडले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सफाई कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नसल्याने त्यांनी शुक्रवारी सकाळी काम बंद आंदोलन पुकारले. घंटागाडी चालक आणि कर्मचाऱ्यांनी शहरातील कचरा उचलण्यास नकार दिल्याने अंबरनाथमध्ये कचऱ्याचे ढीग वाढू लागले आहेत. या परिस्थितीमुळे पालिका प्रशासनात खळबळ उडाली असून, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

Ambernath
Suresh Dhas: आमदार सुरेश धस यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिकेत नोटीस

ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार, एक-दोन महिन्यांचे बिल थकल्यास ते व्यवस्थापन करता येऊ शकते. मात्र, तब्बल सात महिन्यांचे बिल न मिळाल्याने कामगारांचे वेतन, वाहनांचा खर्च आणि इतर व्यवस्थापन कठीण झाले आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

Ambernath
GBS: नागपूरात जीबीएसचा तिसरा बळी, ३२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू, राज्यातील मृतांचा आकडा १२ वर

कचरा वेळेवर न उचलल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, अंबरनाथ पालिकेने शहराच्या स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या निधीच्या वितरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. स्वच्छ भारत अभियान आणि नागरी आरोग्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. पालिका प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढावा अन्यथा शहरातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

Ambernath
Railway General Ticket: रेल्वेच्या जनरल तिकिट नियमांमध्ये बदल, रेल्वे प्रवाशांवर त्याचे काय परिणाम होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com