Gaondevi Dongar : अंधेरीतील प्रसिद्ध गावदेवी डोंगराचा काही भाग कोसळला; साडेसहा कोटी वर्षांपूर्वी बनलेल्या डोंगरालाही पावासाचा फटका

Mumbai Rain News : अंधेरी पश्चिमेकडील जुहू गल्ली परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग कोसळल्याची माहिती आहे. गावदेवी डोंगराची हेरिटेज वास्तूंमध्ये गणना होते.
Gaondevi Dongar
Gaondevi Dongar Saam Digital
Published On

मुंबईत मुसळधार पावसामुळे अंधेरीतील प्रसिद्ध गावदेवी डोंगरचा काही भाग कोसळला आहे. अंधेरी पश्चिमेकडील जुहू गल्ली परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग कोसळल्याची माहिती आहे. गावदेवी डोंगराची हेरिटेज वास्तूंमध्ये गणना होते. यात दोन वाहनांचं देखील नुकसान झालं आहे. अंधेरीत गावदेवी डोंगर गिल्बर्ट हिल नावाने ओळखला जातो. ज्वालामुखीच्या बेसॉल्ट दगडाने बनलेली ही अत्यंत पुरातन असून साडेसहा कोटी वर्षांपूर्वी बनलेला हा डोंगर आहे.

Gaondevi Dongar
Ajit Pawar : पुण्यात पावसाचा कहर! ४८ तासांसाठी धबधबे बंद, लष्कर तैनात; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला पुण्यातील परिस्थितीचा आढावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com