धडगाव तालुक्यातील धनाजे गावात नवरात्र उत्सवाला गालबोट; दोन गटांमध्ये तुफान राडा

नंदुरबारमधील धडगाव तालुक्यातल्या धनाजे गावात नवरात्र उत्सवाला गालबोट लागला आहे. दोन गटांमध्ये तुफान राडा झाला तसेच मूर्तीचीही तोडफोड झाली आहे.
धडगाव तालुक्यातील धनाजे गावात नवरात्र उत्सवाला गालबोट; दोन गटांमध्ये तुफान राडा
धडगाव तालुक्यातील धनाजे गावात नवरात्र उत्सवाला गालबोट; दोन गटांमध्ये तुफान राडादिनू गावित
Published On

नंदुरबार: नंदुरबारमधील धडगाव तालुक्यातल्या धनाजे गावात नवरात्र उत्सवाला गालबोट लागला आहे. धडगाव तालुक्यातील धनाजे गावात नवरात्र उत्सवानिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा झाला तसेच मूर्तीचीही तोडफोड झाली आहे. त्यानंतर धडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. (gang war in two groups in Dhanaje village in Dhadgaon taluka at navratri)

हे देखील पहा -

या कार्यक्रमात सहभागी झालेले जवळपासच्या गावातील आदी रावण ग्रुपच्या तरुणांनी गावातील मुलीची छेड काढल्यानंतर गावकर्‍यांनी त्यांना समज दिली होती. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी आदी रावण ग्रुपचे २० ते ३० तरुण एकत्र येऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी नाचत असताना दुर्गादेवीच्या मूर्तीसमोर बूट, चप्पल घालून गरबा खेळण्यास मनाई केल्यानंतर तरुणांनी तोडफोड सुरू केली. यात दुर्गादेवीच्या मूर्तीची ही अवहेलना केल्याने गावकरी व आदी रावण ग्रुपच्या सदस्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. दोन गटांमध्ये तुफान राडा झालेल्या या हाणामारीत निलेश पावरा यांना लोखंडी रॉडने मारल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना धडगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धडगाव तालुक्यातील धनाजे गावात नवरात्र उत्सवाला गालबोट; दोन गटांमध्ये तुफान राडा
उल्हासनगरात पैशाच्या वादातून दोघांवर जिवघेणा हल्ला; पोलिसावरही चाकूने वार

सदर घटनेमध्ये धडगाव पोलिसांनी २५ जणांवर गुन्हे दाखल करून धरपकड सुरू केली आहे. गावकऱ्यांनी ही पाचपेक्षा जास्त मंडळींना जमवून आदेशाचे उल्लंघन केल्याने आयोजकांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आदीरावण ग्रुपच्या तरुणांकडून मंडप, लाईटींग व दुर्गा देवीची मूर्ती तोडून पाच हजारांचे नुकसान करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com