गणेशोत्सवात बँडच्या तालावर पोलिसांचा ठेका; सामान्यांना मात्र उत्सवबंदी?

कोरोनाच्या सक्त निर्बंधामुळे अनेकजण सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करू शकले नाहीत
गणेशोत्सवात बँडच्या तालावर पोलिसांचा ठेका; सामान्यांना मात्र उत्सवबंदी?
गणेशोत्सवात बँडच्या तालावर पोलिसांचा ठेका; सामान्यांना मात्र उत्सवबंदी?कैलास चौधरी
Published On

कैलास चौधरी

उस्मानाबाद : कोरोनाच्या सक्त निर्बंधामुळे अनेकजण सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करू शकले नाहीत. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात 53 गावात एक गणपती बसवण्यात आला. गणेश उत्सवादरम्यान मंडळांना सोशल डिस्टन्स, मास्क, कोरोना नियम असे निर्बंध पाळता येणार नाहीत, म्हणून भूम पोलिसांनी 52 गाव आणि 1 शहर असे मिळून एक तालुका एक गणपती बसवण्यात आला.

हे देखील पहा-

पोलीस प्रशासनच 53 गावात 1 गणपती बसवणार असल्याने त्याला कोणी विरोध केला नाही. मात्र, त्या उत्सवाचा सगळा आनंद केवळ पोलिसांनी घेतला आहे. मिरवणुकीला, गर्दी जमवण्यासाठी बंदी असताना देखील मोठ्या थाटा माटात गणपतीला निरोप दिला. विसर्जनाच्या दिवशी रात्री बँड पथकाच्या तालावर धुंद होत पोलिसांनी गणरायाला निरोप दिला आहे.

गणेशोत्सवात बँडच्या तालावर पोलिसांचा ठेका; सामान्यांना मात्र उत्सवबंदी?
Gujrat: 9 हजार कोटींची हेरोईन जप्त; जगातली आतापर्यंतची सर्वात मोठी तस्करी

विसर्जन मिरवणुकीचा सगळा आनंद पोलिसांनीच घेतला. मात्र 53 गावातील अनेक गणेशभक्त गणपती उत्सवापासून वंचित राहले आहे. या पोलिसांनी कोरोना नियम पायदळी तुडवल्याचे पाहिल्यानंतर आपल्याला ही वाटेल की राव! आम्ही पण पोलिस असायला हवे होते. सर्व नियम मोडून नाचता आल असत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com