नाशकात डीजेवरून वादाचा दणदणाट; गणेश मंडळ डीजे लावण्यावर ठाम

यंदा २ वर्षांनंतर निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होणार असून लाडक्या बाप्पाचा उत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे.
Nashik News
Nashik NewsSaam Tv
Published On: 

नाशिक - यंदा २ वर्षांनंतर निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होणार असून लाडक्या बाप्पाचा उत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू असतानाच आता नाशकात (Nashik) डीजे वरून वादाचा दणदणाट सुरू झाला आहे.

रात्री १२ वाजेपर्यंत लाऊड स्पीकरला परवानगी आणि मिरवणुकीत डीजे (DJ) वाजवायला परवानगी देण्याच्या मागणीवर शहरातील गणेश मंडळ अडून बसली असून पोलिसांनी परवानगी न दिल्यास थेट मुख्यमंत्र्यांना त्यासाठी साकडं घालण्याची भूमिका गणेश मंडळांनी घेतली आहे.

हे देखील पाहा -

तर दुसरीकडे गणेश मंडळ डीजेसाठी आग्रही असले, तरी शासन निर्णय आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच पालन करत कायद्याच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन पोलीस प्रशासनानं केल आहे. मंडळांनी डीजेची परवानगी मागितली असली, तरी ती देणं शक्य नसल्याचं पोलीस आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Nashik News
Sangli Crime: पैसे न दिल्याच्या रागातून मुलाची आईला मारहाण; आई जखमी

त्यामुळे एकीकडे डीजे लावणारच ही गणेश मंडळांची भूमिका आहे तर दुसरीकडे पोलिसांनी कायद्यावर ठेवलेलं बोट. यामुळे डीजे लावण्यावरून गणेश मंडळ आणि पोलीस प्रशासन आमने सामने आल असून गणेशोत्सवाआधी यावर काही तोडगा निघतो का? याकडे नाशिककरांच लक्ष लागलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.