अकोल्यातील विद्यार्थ्यांने बनवले कागदाच्या लगद्यापासून अष्टविनायक

कागदाच्या लगद्यापासून उत्कृष्ट अशा दीड ते दोन फुटाच्या 8 इकोफ्रेन्डली गणेशमूर्ती साकारल्या आहेत.
अकोल्यातील विद्यार्थ्यांने बनवले कागदाच्या लगद्यापासून अष्टविनायक
अकोल्यातील विद्यार्थ्यांने बनवले कागदाच्या लगद्यापासून अष्टविनायकअॅड. जयेश गावंडे
Published On

अकोला - गणेशोत्सव (Ganesh Festival) जसजसा जवळ येईल तसे अनेकजन विविध प्रकारच्या आणि विविध रुपातल्या गणेशमुर्ती (Ganeshmurti) अनेकजण बनवत असतात. अशीच एक मुर्ती मूर्तिजापूर येथील प्रतिक नगरमध्ये राहणाऱ्या कुणाल मांजरे याने तयार केली आहे. त्याने कागदांपासून सुंदर अष्टविनायक साकारले आहेत.(Ganesha idol made from paper pulp)

हे देखील पहा-

कोरोना (Corona) संकटामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक महिन्यांपासून शाळा-महाविद्यालय बंद आहेत ऑनलाइन अभ्यास सुरु असताना कुणाल घरी राहून कंटाळला होता याच दरम्यान त्याच्यातील कलांवत जागा झाला आणि त्यांने इंटरनेटवरुन अष्टविनायकाचे फोटो गोळा केले त्या फोटोंवरुन घरी असलेली वर्तमान पत्र व अन्य वह्यांची पाने त्याने पाण्यात भिजत ठेवून तयार झालेल्या लगद्यापासून उत्कृष्ट अशा दीड ते दोन फुटाच्या 8 इकोफ्रेन्डली गणेशमूर्ती साकारल्या आहेत.

अकोल्यातील विद्यार्थ्यांने बनवले कागदाच्या लगद्यापासून अष्टविनायक
'सत्य परेशान हो सकता है पराजित नही' भुजबळांच्या 'क्लीन चीट' वर; अमोल मिटकरींच वक्तव्य

कागदांशिवाय इतर कुठल्याही वस्तूचा वापर न कारता सुरुवातीला कुणाल ने तुळजाभवानीचा मुखवटा तयार करुन त्याला तुळजाभवानीचे मुहूर्तस्वरूप दिले होते. उपजत कला असलेल्या कुणालने निसर्गाचे व पर्यावरण संरक्षणाचे भान ठेवून केवळ कागदाच्या लगद्या पासून विविध कलाकृती बणवणार असल्याचे सांगितले. कुणाचेही मार्गदर्शन न घेता जे सुचत गेले ते मी करत गेलो. शाळा आणि अभ्यास करत मी ही कला जोपासत आहे. तसेच भविष्यात पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने मी ही कला अधिक चांगल्या प्रकारे जोपासणार असल्याचही तो म्हणाला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com