maval news
maval newssaam Tv

Crime News: डीजेला विरोध करणाऱ्या कुटुंबाला २१ जणांच्या टोळक्याकडून मारहाण

Maval Crime News: गणपतीच्या मिरवणुकीत डीजे वाजवू न दिल्यानं २१ जणांनी एका कुटुंबाला मारहाण केलीय.

(दिलीप कांबळे)

Crime News:

आज अनंत चतुदर्शी आज आपण गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. परंतु या विसर्जनाला मावळमध्ये गालबोट लागलंय. विसर्जन मिरणुकीत डीजे लावू नका, असं म्हणणाऱ्या व्यक्तीला आणि त्याचा कुटुंबाला मारहाण झालीय. डीजे वाजवू न दिल्यानं २१ जणांनी या कुटुंबाला मारहाण केलीय. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात २१ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Latest News)

प्रशांत शिंदे,असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी प्रशांत शिंदे यांच्या मुलाचं निधन झालं होतं. त्यामुळे ते दु:खात होते. मुलाच्या निधनामुळे शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मुलाच्या निधनामुळे शोकात असताना प्रशांत यांच्या घरासमोरून एक गणपती मिरवणूक जात होती.

त्यावेळी त्यांनी डीजे लावू नका, अशी विनंती मिरवणुकीतील लोकांना केली. डीजे लावण्यास मनाई केल्याचा राग मनात धरत मिरवणुकीतील तब्बल २१ जणांनी प्रशांत यांच्या संपूर्ण कुटंबाला मारहाण केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी सोमाटणे फाटा या ठिकाणी प्रशांत यांच्या घरासमोरून गणपती मिरवणूक जात होती. डीजे लावला जात असल्याचे बघून शिंदे यांनी माझ्या मुलाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. आम्ही दुःखात आहोत, इथे डीजे लावू नका, अशी त्यांनी विनंती केली. आरोपींनी त्यावेळी डीजे लावला नाही.

विसर्जन करू आल्यानंतर या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. डीजे लावू न दिल्याचा राग मनात असल्याने २१ जणांच्या टोळक्यानं शिंदे कुटुंबाला बेदम मारहाण केली.

maval news
Excessive Noise Effects: मिरवणूक, DJ, डान्स आणि मृत्यू! आवाजाच्या अधिक गोंगाटामुळे खरंच मृत्यू होतो का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com